सांगलीत महापुराने २००५ चा रेकॉर्ड मोडला !

सांगलीत महापुराने २००५ चा रेकॉर्ड मोडला !
सांगलीत महापुराने २००५ चा रेकॉर्ड मोडला !

सांगली : सांगलीत आलेल्या महापुराने २००५ सर्वोच्च पातळीचा रेकॉर्ड मोडला. आयर्विन पुलाजवळ आज (ता.७) सकाळी ५४ फूट पाणी पातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरा वेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणी पातळी होती या महापुराने निम्मे शहर पाण्यात असून जिल्ह्यातील ७५ हजारहून अधिक नागरिकांचे स्थलांतर पूर्ण झाले. अनेक गावांचा संपर्क तुटला असून ‘एनडीआरएफ’च्या दोन टीम पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत.

सांगलीत महापुराने शहराला वेढा घातला आहे. रात्रभर पावसाचा जोर ओसरला असला, तरी कोयना धरणातून सोडलेल्या एक लाख २१ हजार क्युसेक इतक्या पाण्याने कृष्णाच्या पाणीपातळी मध्ये मात्र वाढ झाली. त्यामुळे सर्वांत वेगाने पाणी पसरत आहेत रात्री दोन वाजता पाणी पातळी ५३ फूट होती ती सकाळी आठ वाजता ५४ फूट झाली.

शहरातील सराफ कट्टा, मेन रोड, हरभट रोड, एसटी स्टँड, महापालिका चौक, राजवाडा चौक, स्टेशन चौक, शामराव नगर, गावभाग, टिळक स्मारक, मल्टिप्लेक्स या सर्व ठिकाणी पाणी पसरले आहे. शहरातील सुमारे दहा हजार नागरिक या पुराने बाधित झाले असून, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराचे पाणी वाढत असल्याने आणखी किती पातळी होणार या भीतीने नागरिक ग्रस्त झाले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com