agriculture news in Marathi, flood reducing slowly in Kolhapur, Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात पूर ओसरण्याची गती संथ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

कोल्हापूर: जिल्ह्यात पूर संथगतीने उतरत आहे. गेल्या चोवीस तासात सुमारे दोन फुटांनी पाण्याची पातळी ओसरल्याने महत्त्वाचे मार्ग सुरू होण्यास मदत झाली आहे. परंतु, गावागावांतील दळणवळण ठप्पच आहे. विशेष करून शिरोळ तालुक्‍यात अत्यंत संथ गतीने पूर ओसरत असल्याने अजूनही सुमारे चाळीस गावांचा संपर्क पूर्ववत होऊ शकला नाही. गावात जनावरे अडकल्याने बोटींच्या मार्फत जनावरांना चारा देण्याचे काम सुरू आहे. बेटांचे स्वरूप प्राप्त झालेल्य गावांना मंगळवारी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून कोल्हापुरातून मदत पाठविण्यात आली.

कोल्हापूर: जिल्ह्यात पूर संथगतीने उतरत आहे. गेल्या चोवीस तासात सुमारे दोन फुटांनी पाण्याची पातळी ओसरल्याने महत्त्वाचे मार्ग सुरू होण्यास मदत झाली आहे. परंतु, गावागावांतील दळणवळण ठप्पच आहे. विशेष करून शिरोळ तालुक्‍यात अत्यंत संथ गतीने पूर ओसरत असल्याने अजूनही सुमारे चाळीस गावांचा संपर्क पूर्ववत होऊ शकला नाही. गावात जनावरे अडकल्याने बोटींच्या मार्फत जनावरांना चारा देण्याचे काम सुरू आहे. बेटांचे स्वरूप प्राप्त झालेल्य गावांना मंगळवारी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून कोल्हापुरातून मदत पाठविण्यात आली. यामध्ये पाण्याच्या बाट्या, दूध व जेवणाची पाकिटे आदी मदत देण्यात आली. 

आतापर्यंत जिल्ह्यात ३२१ गावांमधून ८१ हजार ८८ कुटुंबांतील ३ लाख ३६ हजार २९७ व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. याकामी ८६ बोटी आणि ४९७ जवान कार्यरत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. पाणी ओसरण्याचा वेग कमी असल्याने साहजिकच विशेष करून ग्रामीण भागातील पूरग्रस्त अद्याप संक्रमण शिबिरातच आहेत. जिल्ह्यात २१० संक्रमण शिबिर सुरू करून त्यामध्ये ७३ हजार ४८९ लोकांची सोय करण्यात आली आहे. यामध्ये एकट्या शिरोळ तालुक्‍यातील ९३ संक्रमण शिबिरामध्ये ४० हजारांवर लोकांची सोय करण्यात आली आहे.

शिरोळ तालुक्‍यात कृष्णा नदीतील महापूर... पहा video


जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील भागात पुराचे पाणी गतीने उतरत असले तरी पूर्वेकडे मात्र इंचाइंचाने उतरत आहे. परिणामी घरे, शेती व रस्ते रिकामे होण्याची गती अत्यंत धीमी आहे. यामुळे नुकसानीत वाढच होण्याची शक्‍यता आहे. अनेक दिवसांपासून घरात पाणी राहिल्याने जिल्ह्यात हजारो घरांची पडझड अद्यापही सुरू आहे. यामुळे पूर ओसरला तरी राहायचे कुठे हा प्रश्‍न पूररग्रस्तांना भेडसावत आहे. 

 मंगळवारी सकाळी कोल्हापूर सांगली हा एकमेव मुख्य मार्ग सुरू झाला. परंतु, या मार्गावर अद्यापही बससेवा सुरू झाली नाही. रस्त्याचे परीक्षण करूनच बससेवा सुरू करणार असल्याची माहिती परिवहन मंडळाच्या सूत्रांनी दिली. या रस्त्याबरोबर शिरोळ नृसिंहवाडी हा रस्ताही मंगळवारी दुपारी सुरू झाला. 

मृत जनावरांच्या विल्हेवाटीचे आव्हान
पूर ओसरले तशी अनेक ठिकाणी गावांत, शेतात मृत पावलेली जनावरे आढळून येत आहेत. ती कुजू लागल्याने त्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. अनेक गावांत मोकळी जागाच नसल्याने प्रशासनाने यावर तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. अनेक ठिकाणी गोठ्यात दावणीला बांधलेल्या स्थितीत मृत जनावरे आढळून येत आहेत. पूर्ण पूर ओसरल्यानंतरच खरी परिस्थिती लक्षात येणार आहे.


इतर अॅग्रो विशेष
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...