agriculture news in Marathi, flood for river in satpuda area, Maharashtra | Agrowon

सातपुड्यातील नद्यांना पूर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

जळगाव ः खानदेशात सातपुडा पर्वतातील सर्वच नद्यांना मागील दोन दिवसांतील पावसामुळे पूर आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात सुसरी नदीच्या महापुरामुळे शहादा तालुक्‍यातील सुमारे २५ गावांना जोडणारे दोन पूल पाण्याखाली गेले आहेत. तर, तळोद्यात खर्डी नदीच्या महापुरामुळे शहरातील ४० टक्के भाग जलमय झाला आहे.

जळगाव ः खानदेशात सातपुडा पर्वतातील सर्वच नद्यांना मागील दोन दिवसांतील पावसामुळे पूर आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात सुसरी नदीच्या महापुरामुळे शहादा तालुक्‍यातील सुमारे २५ गावांना जोडणारे दोन पूल पाण्याखाली गेले आहेत. तर, तळोद्यात खर्डी नदीच्या महापुरामुळे शहरातील ४० टक्के भाग जलमय झाला आहे.

शहादा-नंदुरबार यादरम्यानचा गोमाई नदीवरील प्रकाशानजीकचा पूलही पाण्याखाली गेल्याने शहादा-नंदुरबार यादरम्यानची वाहतूक शुक्रवारी (ता. ९) सकाळी सव्वानऊपर्यंत बंद होती. गोमाई नदीवरील ब्राह्मणपुरी रस्त्यानजीकचा मध्यम प्रकल्प रात्रीतून १०० टक्के भरला असून, त्याचे चार दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. गोमाई नदीवरील शहादा-तिखोरा यादरम्यानचा पूल व शहादा-पिंगणे रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले आहेत. तापी नदीला प्रचंड पूर आल्याने गोमाई व सुसरी नदीच्या पाण्याचा निचरा होत नसल्याची स्थिती आहे.

प्रकाशाजवळील तापी नदीवरील प्रकाशा बॅरेजचे सर्व २७ दरवाजे पूर्ण उघडले आहेत. तरीही, पाण्याचा निचरा हव्या त्या गतीने होत नसल्याने शहादा शहरातील २० टक्के भाग जलमय झाला आहे. नवापुरातील रंगावली नदीला दुसऱ्यांदा महापूर आला. गुरुवारी (ता. ८) मध्यरात्री नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली. सातपुडा पर्वतातून शहादा, तळोदाकडे येणाऱ्या कन्हेरी व इतर नद्यांनाही पूर आला आहे. धुळे जिल्ह्यात पांझरा नदीलाही मोठा पूर आला असून अमळनेर, धुळे तालुक्‍यांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्‍यातील अनेर नदीलाही पूर आला असून, अनेर धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले आहेत.

चोपडा, शिरपुरातील २५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात सातपुडा पर्वतातून येणाऱ्या रावेरातील सुकी, भोकरी नद्यांना पूर आला आहे. तर, यावलमधील मोर नदीलाही तीन वर्षांनंतर प्रथमच पूर आला. सातपुड्यातून येणाऱ्या इतर नाल्यांनाही प्रथमच पूर आला आहे. मध्य प्रदेशातील बैतुल येथे उगम क्षेत्र असलेल्या तापी नदीला मागील १५ दिवसांपासून पूरस्थिती कायम आहे. तापी नदीकाठच्या गावांना जळगाव, धुळे व नंदुरबार प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 


इतर अॅग्रो विशेष
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...
साईप्रवरा शेतकरी कंपनीची उलाढाल पोचली...नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील...
उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोगकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी...
बाजारात रानमेवा खातोय भावअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध...
बोगस कीडनाशकांची विक्री ४००० कोटींवर ! पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट...
शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘...सोलापूर : ठाकरे सरकारकडून किचकट ऑनलाइन...
राज्यातील साखर उत्पादन घटणारपुणे: राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या...
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...
विदर्भापाठोपाठ खानदेशात थंडी वाढतेयपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे...
पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारेअमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
नुकसानग्रस्तांना ५,३०० कोटींचा दुसरा...मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा...
साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...अकोला  ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू...
नोकरीला शेतीची जोड देत उंचावले अर्थकारणआसोदे (ता. जि. जळगाव) येथील नीलेश नारायण माळी एका...
प्रक्रिया उद्योगातून सोयाबीनचे...शहरी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड...
शेवतींच्या फुलांनी जिंकले मन !...मांजरी, पुणे : विविधरंगी शेवंतीच्या फुलांनी...