agriculture news in marathi, flood situation due to heavy rain, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग वाढला; नद्यांना पूर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

पुणे  : पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (ता. ३) रात्रभर जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्व धरणे भरली असल्याने पावसाचा जोर वाढताच धरणातून पाणी सोडावे लागत आहे. बुधवारी सकाळी खडकवासला, मुळशी, पवना, वीर धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुळा, मुठा, पवना, नीरा, भीमा, इंद्रायणी, भामा या नद्यांना पूर आला आहे. उजनी धरणही शंभर टक्के भरल्याने या धरणातून विसर्ग करावा लागणार आहे. 

पुणे  : पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (ता. ३) रात्रभर जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्व धरणे भरली असल्याने पावसाचा जोर वाढताच धरणातून पाणी सोडावे लागत आहे. बुधवारी सकाळी खडकवासला, मुळशी, पवना, वीर धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुळा, मुठा, पवना, नीरा, भीमा, इंद्रायणी, भामा या नद्यांना पूर आला आहे. उजनी धरणही शंभर टक्के भरल्याने या धरणातून विसर्ग करावा लागणार आहे. 

मंगळवारी दुपारपासून धरण क्षेत्रात मध्यम पावसाला सुरवात झाल्यानंतर रात्रभर जोर वाढला होता. बुधवारी (ता. ७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत टेमघर धरणक्षेत्रात ८३, वरसगाव ७०, पानशेत ७१, खडकवासला १९, पवना १०६, कासारसाई ४०, मुळशी ९९, कळमोडी ५, भामा आसखेड ३१, आंद्रा ५८, वडीवळे ९६, गुंजवणी ४७, नीरा देवघर ४४, भाटघर धरण क्षेत्रात १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.  

पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढल्याने धरणांतून पाणी सोडावे लागत आहे. बुधवारी (ता. ४) दुपारी १२ वाजता खडकवासला धरणातून ३१ हजार ४४९ क्युसेक, मुळशी धरणातून २५ हजार २१४ क्युसेक, वीर धरणातून २३ हजार १८५, वरसगाव १२ हजार ४३५, पवना १२ हजार ६००, पानेशत ७ हजार ४१९, गुंजवणी २ हजार ५३७, नीरा देवघर ७ हजार ९३८, भाटघर ७ हजार ८२०, माणिकडोह १ हजार ५०, भामा असखेड १ हजार ६५३, वडीवळे ४ हजार ४०४, आंद्रा १ हजार ४००, कासारसाई ७००, टेमघर ६०४ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे पुणे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले. 


इतर ताज्या घडामोडी
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...
नंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणातून उजनीत १३ हजार ५६...सोलापूर ः उजनी धरणाच्या वरच्या बाजूला...
`पपईचा पिकविमा योजनेत समावेश करा`जळगाव ः खानदेशात कांद्यापाठोपाठ पपईचे...
बार्शीत रेशनचा १५१ पोती गहू, तांदूळ...सोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
‘माढा, पंढरपूर, माळशिरसमधील...सोलापूर ः ‘‘गतवर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या...
परभणीत ऊस, चारा पिकांवर नाकतोड्याचा...परभणी : वांगी (ता.परभणी) येथील ऊस पीक झालेल्या...
पूर्ण कार्यक्षमतेने ऊस गाळप करण्याचे...नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याने जुन्या...
नांदेड जिल्ह्यातील सीएससी केंद्रे सुरू...नांदेड : जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र, आधार...
अकोल्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊसनगर ः दरवर्षी जोरदार पाऊस पडत असलेल्या अकोले...
पुणे जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरीपुणे ः पुणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ४०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
बुलडाणा जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांनी...बुलडाणा ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
जायकवाडीत ५५.३२ टक्के उपयुक्त पाणीपैठण, जि. औरंगाबाद : तालुक्यातील जायकवाडी...
नांदेड जिल्ह्यात ९ लाख ४६ हजार पीकविमा...नांदेड ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
कृषिपंपांना बारा तास वीज पुरवठा करा ः...भंडारा : टाळेबंदी काळातही शेतकऱ्यांनी मोठ्या...