राजापूर, संगमेश्‍वर तालुक्यात पूरस्थिती

राजापूरात अर्जुना नदीला पूर आल्याने दुकानांमध्ये पाणी शिरले
राजापूरात अर्जुना नदीला पूर आल्याने दुकानांमध्ये पाणी शिरले

रत्नागिरी  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून राजापूर, संगमेश्‍वर तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. सावित्री, जगबुडी, बावनदीसह काजळी, अर्जूना या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. समुद्र खवळलेला असून मुंबई, रायगडसह केरळ, कर्नाटकातील दोनशे नौका जयगड (ता. रत्नागिरी) बंदरात दाखल झाल्या आहेत.

जिल्ह्यात बुधवारी (ता. ४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड येथे ९५, दापोली येथे १०५, खेड येथे ११०, गुहागर येथे ९३, चिपळूण येथे १४०, संगमेश्‍वर येथे ८३, रत्नागिरी येथे ८२, लांजा येथे ८२, राजापूर येथे ११५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसाने गणेशोत्सवात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यातून

गेल्या चार दिवसांत दुसऱ्यांदा राजापुरात पूरस्थिती निर्माण झाली. तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. शहरातील चिंचबांध, बंदरधक्का परिसर पाण्याखाली गेला आहे. शीळ-गोठणे दोनीवडे रस्ताही पाण्याखाली गेला आहे. कोदवली नदीच्या काठावरील छोटी दुकाने पुराच्या पाण्यात गेली आहेत. बुधवारी दिवसभर पावसाचा जोर कायम असल्याने पुराचे पाणीही वाढत होते. नद्यांच्या काठावरील भातशेती उभारी घेत असताना ही शेती पुन्हा एकदा पाण्याखाली गेली. संगमेश्‍वर तालुक्यातील फुणगूस भागामध्ये गडनदीचे पाणी घुसले. काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने किनारी भागातील लोकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com