agriculture news in marathi, flood situation review meeting, pune, maharashtra | Agrowon

नुकसानग्रस्तांना शासकीय निकषांनुसार मदत देऊ : चंद्रकांत पाटील

टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

पुणे  : पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे बहुतांश धरणांतून विसर्ग सुरू आहे. नुकसान झालेल्या भागात पंचनामे करून अहवाल सादर करा, नुकसानग्रस्तांना शासनाच्या निकषांप्रमाणे मदत केली जाईल. आपत्तीच्या काळात जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवत सतर्क राहावे, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

पुणे  : पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे बहुतांश धरणांतून विसर्ग सुरू आहे. नुकसान झालेल्या भागात पंचनामे करून अहवाल सादर करा, नुकसानग्रस्तांना शासनाच्या निकषांप्रमाणे मदत केली जाईल. आपत्तीच्या काळात जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवत सतर्क राहावे, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या स्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री श्री. पाटील पुणे जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रिडा संकुल सभागृहात पूरस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी संजय भेगडे, महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव, आमदार बाबुराव पाचर्णे, राहुल कुल, योगेश टिळेकर, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त सौरभ राव, पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, की पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरली आहेत. धरणक्षेत्रांत पाऊस सुरूच आहे, आणखी दोन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत धरणांचे सनियंत्रण करावे. आरोग्य विभागाने दक्ष राहावे, आवश्यक त्या लसींसह औषधांचा पुरेसा साठा ठेवावा, गरजेप्रमाणे औषधांची मागणी तातडीने नोंदवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. तसेच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यासंबंधीचा अहवाल सादर करावा. असुरक्षित रस्ते, पूल बंद करावेत. कोणतीही दुर्घटना होणार नाही, याबाबतची काळजी घ्यावी.

जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, पुणे जिल्ह्यात ९१७.४८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर वगळता उर्वरित सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातून तीन मोठ्या नद्या वाहत आहेत, त्यामुळे योग्य दक्षता घेतली जात आहे. पूरस्थितीमुळे आतापर्यंत तीन हजार ३४३ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले असून यामध्ये १३ हजार ३३६ नागरिकांचा समावेश आहे.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...
पपई दरांचा नंदुरबारात पुन्हा तिढाशहादा, जि. नंदुरबार  : सध्या मंदी असल्याने...
पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन...अमरावती  ः जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात...
गडचिरोली : 'आयसीएआर'ची काजू पीक...गडचिरोली  ः भात उत्पादक पूर्व विदर्भात...
ऐन फेब्रुवारीतच उन्हाळ्याच्या झळा पुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
वनबंधू योजना सुरू करण्यासाठी केंद्राकडे...नाशिक : आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेअंतर्गत १४...
मराठवाड्यातील रेशीम प्रकल्पाला ग्रीन...औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या रेशीम...
`गोवर-रुबेला'त सोलापूर जिल्ह्यात...सोलापूर : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘गोवर-...
सांगली जिल्ह्यात शेत, पाणंद रस्त्यांचे...लेंगरे, जि. सांगली : शेत आणि पाणंद रस्त्यांचे...
पाणीवाटप संस्थेद्वारे मिळणार ‘ताकारी’चे...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ...
मका संशोधन केंद्राचे भिजत घोंगडेऔरंगाबाद : कार्यकारी परिषदेच्या ठरावानंतर...