agriculture news in marathi, The flood situation started to decline, kolhapur, maharashtra | Agrowon

कोल्हापुरात पूरस्थिती निवळण्यास सुरवात
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

कोल्हापूर : पूर्वेकडील शिरोळ तालुका वगळता जिल्ह्यातील पूरस्थिती निवळण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांशी मार्ग मोकळे झाले आहेत. दहा ते बारा दिवसांच्या खंडानंतर शुक्रवारी (ता.१६) अनेक गावांमध्ये प्रवेश करणे शक्‍य झाले. मार्ग खुले होत असले तरी गावांशेजारील शेतांमध्ये मात्र पाणी तसेच साचून राहिल्याने नुकसानीची व्याप्ती वाढण्याची शक्‍यता आहे. 

कोल्हापूर : पूर्वेकडील शिरोळ तालुका वगळता जिल्ह्यातील पूरस्थिती निवळण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांशी मार्ग मोकळे झाले आहेत. दहा ते बारा दिवसांच्या खंडानंतर शुक्रवारी (ता.१६) अनेक गावांमध्ये प्रवेश करणे शक्‍य झाले. मार्ग खुले होत असले तरी गावांशेजारील शेतांमध्ये मात्र पाणी तसेच साचून राहिल्याने नुकसानीची व्याप्ती वाढण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यात पूरस्थितीच्या कालावधीत ३६९ गावांमधून १ लाख २ हजार ४४१ कुटुंबांतील ४ लाख ७ हजार १३४ व्यक्तींचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत कोल्हापुरात पंचगंगा नदीची पातळी ३३ फूट सहा इंच इतकी होती आणि २५ बंधारे पाण्याखाली होते.

पुरामुळे संक्रमण शिबिरात आलेले अनेक नागरिक पाणी कमी होईल तसे घरी परतत आहेत. विशेष करून पंचगंगा तीरावरील  गावांत गतीने पाणी कमी झाले. जिल्ह्यात अद्यापही १८१ संक्रमण शिबिरे सुरू असून, त्यामध्ये ५६ हजार ३९४ लोकांची सोय करण्यात आली आहे. शिरोळ तालुक्‍याला पुराचा सर्वाधिक फटका बसला. कृष्णा नदीची पातळी अतिशय धीम्या गतीने कमी होत असल्याने अजून सुमारे दहा गावांचे मार्ग बंद आहेत. काही ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. कुरुंदवाड आगार वगळता अन्य आगारांची बस वाहतूक नियमित सुरू आहे. अनेक ठिकाणी चिखलामुळे मार्ग बंद आहेत. जिल्ह्यातील ३१० पूरग्रस्त गावांतील वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्य; तसेच स्वच्छतेच्या कामांस प्राधान्य देऊन घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी शासनाकडून २ कोटी ८९ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी दिली.

पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये बऱ्याच ठिकाणी घनकचरा, मलबा, ओला कचरा व सांडपाणी जमा झाला आहे. या परिस्थितीत गावांमध्ये वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्य; तसेच स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊन विखुरलेला कचरा गोळा करून, कचऱ्याचे वर्गीकरण; तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत निधी वितरित करण्यात आला आहे.

यात २०११ च्या जनगणनेनुसार १००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांना ५०,००० रुपये आणि १००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना रुपये एक लाख विशेष बाब म्हणून निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घोषित केलेल्या ३१० पूरग्रस्त गावांना स्वच्छतेच्या कामांसाठी दिला जाणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरीनाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील...
तोलाई परिपत्रक होणार रद्द पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले...नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत...
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून...नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच...
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची...सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...
थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध...
आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला...नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात...
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...सातारा ः माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना...
विषबाधेच्या चौकशीची फाइल अडली गृह...नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...