Agriculture news in Marathi, The flood situation in Vidarbha with the offspring of rain | Agrowon

विदर्भात काही भागात पावसाच्या संततधारेने पूरस्थिती

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

नागपूर ः विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी (ता. ४) सायंकाळी अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून तत्काळ १५ जणांच्या आपत्कालीन पथकाची नियुक्‍ती या भागात करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली. तर गडचिरोली जिल्ह्यातील शंभरावर गावांचा संपर्क तिसऱ्या दिवशीदेखील तुटलेला होता.

नागपूर ः विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी (ता. ४) सायंकाळी अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून तत्काळ १५ जणांच्या आपत्कालीन पथकाची नियुक्‍ती या भागात करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली. तर गडचिरोली जिल्ह्यातील शंभरावर गावांचा संपर्क तिसऱ्या दिवशीदेखील तुटलेला होता.

चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी परिसरात अनेक घरांची पडझड झाली. पळसगावातील महारबोडीची पाळ फुटल्यामुळे गावातील वीस घरांचे नुकसान झाले. या कुटुंबीयांना रात्री उशिरा ग्रामपंचायत कार्यालयात हलविण्यात आले. नुकसान झालेल्यांमध्ये महादेव गावतुरे, शत्रुघ्न गुळधे, वसंत बनसोड, जगदीश बनसोड, मारोती चौधरी, नामदेव गावतुरे, हरिचंद गुलढे, विश्‍वनाथ सोनुले व खुटाळा येथील रामदास डहारे, उसेगाव येथील वनराज डांगे यांचा समावेश आहे. 

गडचांदूर परिसरातही पावसाने हाहाकार उडाला. लखमापूर येथे सुभाष बापूराव मालेकर यांचे कवेलूचे दोन मजली घर कोसळले. यामध्ये एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून तलाठी जाधव यांनी पंचनामा केला. शासनाने तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी सुभाष मालेकर यांनी केली आहे. अनेक भागात नदी, नाले ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने शेकडो हेक्‍टरवरील पिकाची नासाडी झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी भामरागड तालुक्‍यात २४३.३ मिमी इतक्‍या पावसाची नोंद करण्यात आली.

चामोर्शी तालुक्‍याच्या भेंडाळा येथे संततधार पावसामुळे दोन घरांची पडझड झाली. विजय नामदेव डांगे, सिंधूबाई मारोती दहिकर यांचे यात नुकसान झाले. तलाठी धनराज रोडमाके, सरपंच वनीता पोरेट्टीवार, पोलिस पाटील श्रीरंग म्हशाखेत्री, कोतवाल मोरेश्‍वर साखरे यांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. गडचिरोली शहराच्या इंदिरानगर भागात कांताबाई एकनाथ वासेकर यांचेही घर कोसळले. अमरावतीच्या मोर्शी शहरात पाणी साचल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल तर गुरुवारी (ता. ५) कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पुराचे पाणी अनेकांच्या घरात शिरल्याने नुकसान झाले.
 


इतर ताज्या घडामोडी
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...
पुणे विभागात खरीप पेरणीत अडीच लाख...पुणे ः यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने चांगली...
बिबट्याच्या पिंजऱ्यांशेजारीच बसून करणार...मंचर : वनखात्यानेही बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी...
खरीप पीक कर्जासाठी भाजपचा आज ठिय्याअमरावती : खरीप हंगाम अर्ध्यावर आला असतानासुद्धा...
औरंगाबादेत ग्राहकांचा रानभाज्या खरेदीला...औरंगाबाद ः आरोग्यदायी व अनेक औषधी गुणधर्म...
नगर जिल्ह्यात तुरीचा ५४ हजार हेक्टरवर...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला...
रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ पैकी ४८ धरणे...रत्नागिरी ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी...
सांगलीत अडीच हजार क्विंटल मक्याची खरेदीसांगली ः जिल्ह्यातील तीन हमीभाव केंद्रांच्या...
निकृष्ट बियाणे पुरवठादार कंपन्यांवर...अमरावती: निकृष्ट दर्जाच्या बियाणे पुरवठा प्रकरणात...
मराठवाडा विभागातील हवामानानुसार पीक...मराठवाडा विभागातील एकूण हवामान, पर्जन्यमान या...
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...