सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी १३३.७९ कोटी 

​ सांगलीजिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या महापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १३३ कोटी ७९ लाख ३७ हजार रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला.
 सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी १३३.७९ कोटी  Of the flood victims in Sangli 133.79 crore for assistance
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी १३३.७९ कोटी  Of the flood victims in Sangli 133.79 crore for assistance

सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या महापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १३३ कोटी ७९ लाख ३७ हजार रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला. उर्वरित पूरग्रस्त, अपार्टमेंटमधील कुटुंब, दुकानदारांना येत्या आठवड्यापासून भरपाई मिळेल. दरम्यान, यापूर्वी २९ हजार ५६८ कुटुंबांना दहा हजारांप्रमाणे २९.५० कोटींचे सानुग्रह अनुदान वाटले आहे.  महापुराचा सांगली शहरासह वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज तालुक्यांतील ११३ गावांना तडाखा बसला. कृष्णा, वारणा काठावरील गावे पाण्याखाली गेली. सांगलीसह चार तालुक्यांतील कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले. नदीकाठावरील ९७ हजार ४८६ शेतकऱ्यांची ४० हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली होती. पूर ओसरल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले होते. महापुराचे पाणी आलेले आणि पाण्यामुळे स्थलांतरित झालेल्या ७३ हजार ९६७ कुटंबांचे पंचनामे झाले. ५२३ घरे पूर्णत: नष्ट झालेली आहेत. पक्की घरे १७४ नष्ट झाली. २९०० कच्ची घरे अंशतः नष्ट झाली असून, १३८४ पक्क्या घरांचे नुकसान झाले. १५०० गोठ्यांचेही नुकसान झाले असून, १९ झोपड्यांचे पंचनामे करण्यात आलेत. पुराच्या पाण्यामुळे १२१ लहान-मोठी जनावरांचा मृत्यू झाला. शेती, कुटुंबाशिवाय व्यापाऱ्यांना फटका बसला. १२ हजार ५८३ दुकानदारांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. ९४५ बारा बलुतेदारांसह ७ हजार २४२ टपरीधारकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले.  पूरग्रस्तांच्या प्रलंबित असलेल्या मदतीबाबत राज्य शासनाने शुक्रवारी सायंकाळी उशिराने याबाबतचे आदेश काढले आहेत. पूरग्रस्तांसाठी ५५४ कोटी ८७ लाख ५३ हजार रुपयांचा निधी आज मंजूर केला. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या तरतुदीनुसार देय असलेली १५ कोटी ५३ लाख ५२ हजार रुपये इतका निधी आणि राज्य शासनाने दिलेली ११८ कोटी २६ लाख ३७ हजार रुपये इतकी वाढीव निधी, असा एकूण जिल्ह्याच्या वाट्याला १३३ कोटी ७९ लाख ८९ हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. हा निधी विभागीय आयुक्तांमार्फत जिल्हाधिकारी यांना वितरित होईल. 

  • जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी आलेला निधी 
  • सानुग्रह अनुदान - ४७.९४ कोटी 
  • मृत जनावरे - ३४.५१ लाख 
  • घरांची पूर्ण, अंशतः पडझड- १८.१९ कोटी 
  • मत्स्य व्यावसायिक- १.५२ कोटी 
  • हस्त कारागीर, बारा बलुतेदार- ३.७० कोटी 
  • दुकानदार- ५५.२० कोटी 
  • शेतजमीन नुकसान- २.३७ कोटी 
  • मदत छावणी- १.४१ लाख 
  • कुक्कुटपालन शेड- ४.३१ लाख 
  • सार्वजनिक ठिकाणांवरील कचरा उचलणे- ३.४८ कोटी 
  • रत्नागिरीत पूरग्रस्त शेतकऱ्यांना  जुन्या निकषानुसार भरपाई 

    रत्नागिरी : जुलै महिन्यात ढगफुटीमुळे आलेल्या पुराचा रत्नागिरी जिल्ह्याला मोठा फटका बसला होता. घरे, गोठे, दुकाने यासह शेतीचे नुकसान झाले. जुन्या निकषानुसार आपद्ग्रस्तांना भरपाई देण्यापेक्षा वाढीव निधीची तरतूद राज्य शासनाने केली. त्यामधून जिल्ह्याला ४४ कोटी २९ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे; मात्र शासनाने शेतीच्या नुकसानीपोटी जुन्याच निकषानुसार मदत वाटपाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्याला अडीच कोटी मिळणार आहेत.  जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात पूरस्थिती आणि दरडी कोसळण्याचे प्रकार घडले. यामध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तांचे नुकसान झाले. रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ही स्थिती होती. याचा सर्वाधिक फटका चिपळूण शहराला बसलेला होता. जिल्हा प्रशासनाकडून झालेल्या पंचनाम्यानुसार आठशे कोटीचे नुकसान नोंदले गेले होते. त्यात शेतीचे ८ कोटी ४८ लाखाचे तर मत्स्य व्यावसायाचे १६ लाख ८० हजाराचे नुकसान झाले होते. आपद्ग्रस्तांनासाठी तत्काळ पाच हजार रुपयांचे वाटपही करण्यात आले होते. सुमारे पावणे दोन कोटी रुपयो वितरीत केले गेले. आपद्ग्रस्तांनासाठी राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण व्यवस्थापनच्या निकषापेक्षाही जादाची मदत देण्यासाठी राज्य शासनाकडून निधी तरतूद केली जाणार होती. त्यानुसार नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ४४ कोटी २९ लाख १७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्यासाठी ५५४ कोटी ८७ लाख रुपये निधी जाहीर झाला आहे. पूर येऊन दोन महिने झाले तरीही आपद्ग्रस्तांना भरपाई मिळालेली नव्हती. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. चिपळूणातील व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. मात्र या बाबतचा शासन निर्णय १६ सप्टेंबरला काढण्यात आल्यामुळे येत्या काही दिवसांत आपद्ग्रस्तांना थेट बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहे.  पूर परिस्थितीसह दरडी कोसळल्यामुळे शेतीचे सुमारे अडीच हजार हेक्टरचे नुकसान झाले होते. त्यात माती शेतामध्ये साचून राहिल्यामुळे साडेसातशे हेक्टरचे नुकसान आहे. शेतीसाठी हेक्टरी १६ हजार रुपये मदत एसडीआरएफच्या निकषानुसार दिली जाते. राज्य शासनाकडून शेतीसाठी वाढीव निधी मिळेल अशी अपेक्षा होती; परंतु त्यात भरीव वाढ झालेली नाही. तौक्ते आणि निसर्ग चक्रीवादळाच्या वेळीही हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात आली होती. 

    निकषनिहाय मिळालेली मदत 

  • कपडे, घरगुती भांडी किंवा वस्तूंसाठी ः ४ कोटी ६८ लाख ५७ हजार 
  • मृत जनावरे ः २ कोटी ९० लाख ८८ हजार 
  • कच्ची, पक्की घरे व झोपड्या, गोठे ः ७ कोटी ६४ लाख ७२ हजार 
  • शेत जमीनीचे नुकसान ः २ कोटी ३६ लाख 
  • मत्स्य व्यावसायीक ः २ लाख २३ हजार 
  • कारागिरांचे नुकसान ः १४ लाख १ हजार 
  •  दुकानदार ः २५ कोटी ५५ लाख ५६ हजार 
  • टपरीधारक ः ९६ लाख ६० हजार 
  • कुक्कुटपालन ः ६० हजार  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com