agriculture news in Marathi flood water decreasing in Kolhapur Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे, त्यामुळे पूर आलेल्या नद्यांची पाणीपातळी कमी होत असल्याने जिल्ह्यातील बहुतांशी भागाला सोमवारी (ता.२६) दिलासा मिळाला.

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे, त्यामुळे पूर आलेल्या नद्यांची पाणीपातळी कमी होत असल्याने जिल्ह्यातील बहुतांशी भागाला सोमवारी (ता.२६) दिलासा मिळाला. गेल्या सलग चार दिवसांपासून बंद असलेला पुणे बेंगळुरू महामार्ग अखेर सोमवारी सकाळी दहा वाजता वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली होती. महापुराने पुणे-बेंगळुरू महामार्गावर शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी सहा ते दहा फुटांवर पाणी साचले होते. त्यामुळे हा मार्ग शुक्रवारी सायंकाळी सहानंतर बंद करण्यात आला होता. 

पुराचा सर्वाधिक फटका बसत असलेल्या पूर्व भागातील नद्यांचे पाणीही सोमवारी दुपारपर्यंत सुमारे दोन फुटांनी कमी झाल्याने पूर क्षेत्रातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अनेक गावांतील पाणी वेगाने कमी होत असल्याने प्रशासनावरील ताण कमी झाल्याचे दिसले. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दिवसभर ऊन असल्याने स्थानिक ओढे नाल्यांचे पाणी कमी होण्यास मदत झाली. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पातळी दुपारी २ वाजता ४८.३ फूट होती. 

राधानगरी तालुक्यातील तिन्ही धरणांवर पावसाने पूर्णतः उघडीप दिली आहे. परिणामी राधानगरी धरणाची पाणी पातळी कमी झाली आहे. टप्प्याटप्प्याने उघडलेले स्वयंचलित दरवाजे बंद होऊ लागले आहेत. रविवारी दुपारी राधानगरी धरण भरल्यानंतर पाच स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते, ते सोमवारी सकाळपर्यंत खुले होते. दरम्यान ३४७ .५७ फुटांची पाणीपातळी कमी होऊन ३४७ फुटांपर्यंत खाली आली. त्यामुळे स्वयंचलित दरवाज्यांवरील ताण कमी होऊन आता हळूहळू दरवाजे बंद होत आहेत. दुपारी एकपर्यंत पाचपैकी तीन बंद झाले. पाणलोट क्षेत्रातून पाणी येत असले तरी पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने पाण्याचा ओघ कमी राहणार आहे. परिणामी भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने ओसरण्यास मदत होईल. 

दरम्यान, काळम्मावाडी धरण सांडवा पातळीच्या वर आल्याने त्यातील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. यामुळे दूधगंगेची पाणी पातळी वाढणार आहे. त्याबरोबरच तुळशी धरणातूनही ७५० ते १००० क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराटसुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती....
ऑनलाइन ठिबक योजनेत पुन्हा कागदपत्रांचा...पुणे : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची परंपरा...
सर्वदूर जोरदार पावसाची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’...
प्रगतिपथावरील जलसंधारण प्रकल्प लवकर...औरंगाबाद : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य...
‘रूफटॉप सौरऊर्जे’ला कसे मिळणार बूस्टर?नागपूर ः दीर्घ खोळंब्यानंतर महावितरणने पुन्हा...
केळी, संत्रा क्लस्टरमध्ये वर्ध्याचा...वर्धा : केंद्राच्या धर्तीवर राज्याने निर्यात धोरण...
सांगलीत ३० टक्के द्राक्ष फळछाटणी पूर्णसांगली ः जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष फळ छाटणीस...
‘अलमट्टी’ची उंची वाढवू नका ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व बेळगाव...
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...