agriculture news in Marathi flood water decreasing in Kolhapur Maharashtra | Page 3 ||| Agrowon

कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे, त्यामुळे पूर आलेल्या नद्यांची पाणीपातळी कमी होत असल्याने जिल्ह्यातील बहुतांशी भागाला सोमवारी (ता.२६) दिलासा मिळाला.

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे, त्यामुळे पूर आलेल्या नद्यांची पाणीपातळी कमी होत असल्याने जिल्ह्यातील बहुतांशी भागाला सोमवारी (ता.२६) दिलासा मिळाला. गेल्या सलग चार दिवसांपासून बंद असलेला पुणे बेंगळुरू महामार्ग अखेर सोमवारी सकाळी दहा वाजता वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली होती. महापुराने पुणे-बेंगळुरू महामार्गावर शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी सहा ते दहा फुटांवर पाणी साचले होते. त्यामुळे हा मार्ग शुक्रवारी सायंकाळी सहानंतर बंद करण्यात आला होता. 

पुराचा सर्वाधिक फटका बसत असलेल्या पूर्व भागातील नद्यांचे पाणीही सोमवारी दुपारपर्यंत सुमारे दोन फुटांनी कमी झाल्याने पूर क्षेत्रातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अनेक गावांतील पाणी वेगाने कमी होत असल्याने प्रशासनावरील ताण कमी झाल्याचे दिसले. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दिवसभर ऊन असल्याने स्थानिक ओढे नाल्यांचे पाणी कमी होण्यास मदत झाली. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पातळी दुपारी २ वाजता ४८.३ फूट होती. 

राधानगरी तालुक्यातील तिन्ही धरणांवर पावसाने पूर्णतः उघडीप दिली आहे. परिणामी राधानगरी धरणाची पाणी पातळी कमी झाली आहे. टप्प्याटप्प्याने उघडलेले स्वयंचलित दरवाजे बंद होऊ लागले आहेत. रविवारी दुपारी राधानगरी धरण भरल्यानंतर पाच स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते, ते सोमवारी सकाळपर्यंत खुले होते. दरम्यान ३४७ .५७ फुटांची पाणीपातळी कमी होऊन ३४७ फुटांपर्यंत खाली आली. त्यामुळे स्वयंचलित दरवाज्यांवरील ताण कमी होऊन आता हळूहळू दरवाजे बंद होत आहेत. दुपारी एकपर्यंत पाचपैकी तीन बंद झाले. पाणलोट क्षेत्रातून पाणी येत असले तरी पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने पाण्याचा ओघ कमी राहणार आहे. परिणामी भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने ओसरण्यास मदत होईल. 

दरम्यान, काळम्मावाडी धरण सांडवा पातळीच्या वर आल्याने त्यातील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. यामुळे दूधगंगेची पाणी पातळी वाढणार आहे. त्याबरोबरच तुळशी धरणातूनही ७५० ते १००० क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. 
 


इतर बातम्या
मराठवाड्यात नुकसानग्रस्त पिकांचे ६७.२६...औरंगाबाद : प्राथमिक अंदाजात जवळपास १५ लाख हेक्‍...
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त...नांदेड : जिल्ह्यात जुले, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये...
जळगावातील धरणांत ८० टक्के उपयुक्त...जळगाव ः जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत लावलेल्या...
ऊसबिलाचे तुकडे पाडू  दिले जाणार नाहीत...सातारा : ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाहीत,...
'लासलगाव'च्या कांद्याला टपाल पाकिटावर...नाशिक : कांदा पिकासाठी लासलगाव परिसराची राष्ट्रीय...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...