Agriculture news in marathi Flooded by political leaders Part tours should be avoided | Page 2 ||| Agrowon

राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे टाळावेत : पवार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 जुलै 2021

राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे टाळावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. पवार यांनी मुंबईतील राष्ट्रवादी भवनात मंगळवारी (ता. २६) पत्रकारांशी संवाद साधला.  

मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे टाळावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. पवार यांनी मुंबईतील राष्ट्रवादी भवनात मंगळवारी (ता. २६) पत्रकारांशी संवाद साधला. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘पावसामुळे सहा जिल्ह्यांत प्रचंड नुकसान झाले आहे. येथील पूरस्थिती ओसरली आहे. राजकीय नेते दौऱ्यावर जात आहेत. पूरग्रस्त भागात दौऱ्यावर जाणे नेत्यांनी टाळावे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यंत्र्यांनी परिस्थिती समजून घेण्यासाठी दौरे केलेच पाहिजेत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांचे दौरे लोकांना धीर देण्यासाठी महत्त्वाचे ठरतात.  शासकीय यंत्रणा, कार्यकर्ते पूरग्रस्तांसाठी मदतकार्य करत आहेत. माझे आवाहन आहे, मोठ्या नेत्यांनी दौरे करू नयेत. प्रशासकीय यंत्रणा आपल्या भोवती ठेवणे योग्य नाही. ज्यांचा त्या भागाशी संबंध नाही, त्यांनी दौरे टाळावेत. राज्यपाल पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. ते केंद्राकडून जास्त मिळवून देतील, अशी आशा आहे.’’ 

‘राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट’कडून मदत
सहा जिल्ह्यांत जवळपास १६ हजार कुटुंबांना फटका बसला आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टमार्फत या १६ हजार कुटुंबांना मदत केली जणार आहे. १६ हजार कुटुंबासाठी १६ हजार किट्सचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये भांडी, मास्क, पांघरुन आणि इतर जीवनावशक वस्तूंचा समावेश असेल. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूरग्रस्त भागात वैद्यकीय पथके पाठवली जाणार आहेत, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. 

माळीणच्या धर्तीवर पुनर्वसन
अतिवृष्टीमुळे राज्यात मोठे नुकसान झाले आहे. सात जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांतही शेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांना मदतीची गरज आहे. सहा जिल्ह्यांतील पूरस्थितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम मदत जाहीर करेल, अशा संकटांचा सामना करण्याचा महाराष्ट्राला अनुभव आहे. माळीण गावाचे राज्य सरकारने पुनर्वसन केले आहे, त्याच पद्धतीने आताही पूरग्रस्त भागातील नागरिकांचे पुनर्वसन केले जाईल, असेही पवार म्हणाले.


इतर बातम्या
सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...
मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...
तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...