रत्नागिरीत पूरस्थिती कायम, भातशेती पाण्यात

रत्नागिरीत पूरस्थिती कायम, भातशेती पाण्यात
रत्नागिरीत पूरस्थिती कायम, भातशेती पाण्यात

रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात भातशेती पाण्यात आहे. काजळी नदीला आलेल्या पुराचे पाणी पोमेंडी, सोमेश्‍वर, हातीससह गुरुमळी येथील शेतात शिरले आहे. पुराच्या पाण्याबरोबर आलेला गाळही भातशेतीमध्ये साचून राहिल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

बुधवारी (ता. ७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १०७ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यातील मंडणगड १०१, दापोली १२५, खेड ११०, गुहागर १३१, चिपळूण १७०, संगमेश्‍वर ११८, रत्नागिरी २९, लांजा १०३ आणि राजापूर मंडळात ८२ मिमी पाऊस झाला. १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात ३२५७ मिमी पाऊस झाला.

चिपळूण, राजापूर शहर सलग तीन दिवस पुराच्या पाण्यात होते. माखजनसह संगमेश्‍वर बाजारपेठेमध्ये पाणी घुसले. वाशिष्ठी, जगबुडी, शास्त्री, बावनदी, काजळी या जिल्ह्यांतील मोठ्या नद्यांना पूर आला आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील दहा ते बारा गावातील भातशेतीमध्ये पाणी शिरले आहे. अजूनही पाणी साचून असल्यामुळे नुकसानीचा आकडा सांगणे कठीण असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीच्या पुराचे पाणी किनाऱ्या‍वरील गुरुमळी भागातील शेखर नेने यांच्या भातशेतीमध्ये साचून राहिले आहे. पूर ओसरला तरीही गाळ जमिनीवरच असल्याने तिथे दुबार पीक करणेही शक्य नाही. भातशेती नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. गुरुमळी येथील सुमारे साडेतीन एकर जमीन आहे. पोमेंडी येथे सुमारे दहा ते बारा एकर जमीन असून काजळीच्या नदी किनाऱ्या‍वर सुमारे पन्नास एकराहून अधिक शेती बाधित होऊ शकते, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

आवश्यक वस्तूंचा तुटवडा रत्नागिरी-कोल्हापूर, कराड-चिपळूण आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीत सातत्याने अडथळे निर्माण झाल्यामुळे भाजी, दुधासह इंधनाचा रत्नागिरी जिल्ह्यात तुटवडा जाणवत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com