सांगलीतील पूर ओसरू लागला  

कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली शहराला मोठा फटका बसला होता. सोमवारी (ता. २६) विळखा सैल होऊ लागला आहे. पुराचे पाणी उतरू लागले आहे.
सांगलीतील पूर ओसरू लागला  The floods in Sangli started receding
सांगलीतील पूर ओसरू लागला The floods in Sangli started receding

सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली शहराला मोठा फटका बसला होता. सोमवारी (ता. २६) विळखा सैल होऊ लागला आहे. पुराचे पाणी उतरू लागले आहे. सांगलीत सकाळी नऊ वाजेपर्यंत दीड फूट पाणी उतरले आहे त्यामुळे काही परिसर आता रिकामा झाला आहे. भिलवडी येथे एक फूट पाणी पातळी उतरली आहे, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.  सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठचा परिसर गेल्या तीन दिवसांपासून महापुराचा बुडाला होता. आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी ५५ फुटांचा जवळ पोहोचली होती, मात्र कोयना आणि वारणा धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी केल्याने पुराचे पाणी वाढले नाही. रविवारी (ता. २५) सकाळी अकरावाजेपासून पाणीपातळी स्थिर राहिली. त्यानंतर सायंकाळी पाचपासून हळूहळू पाणी उतरण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यातील बहे पूल रविवारी सकाळीच रिकामा झाला. त्यानंतर ताकारी पुलाजवळ हळूहळू पाणी उतरत होते. मात्र सांगली आणि भिलवडीत पाणी पातळी सुमारे पाच तास स्थिर होती. सांगलीत सोमवारी सकाळी नऊ वाजता ५३.२ इंच इतकी पाणी पातळी होती. सुमारे दीड फूट पाणी पातळी असल्यामुळे गणपती पेठ, सराफ कट्टा परिसर मोकळा झाला. मात्र त्याला एसटी स्टँड परिसर, मारुती चौक, मारुती रोड, हिराबाग कॉर्नर, स्टेशन रोड तसेच उपनगरांमध्ये अद्यापही पाणी असल्याने नागरिकांना पूर उतरण्याची अजून काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

दोन लाख जणांसह, ३२ हजारांहून अधिक जनावरांचे स्थलांतर  जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपट्यातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. आतापर्यंत ४१ हजार ८४ कुटुंबातील १ लाख ९६ हजार ९५७ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच लहान व मोठी, अशा एकूण ३२ हजार ३ जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.  स्थलांतरित व्यक्तींमध्ये मिरज तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्र (शहरी) १३ हजार ४४९ कुटुंबांमधील ६५ हजार १३५ व्यक्ती, मिरज ग्रामीण क्षेत्रातील १ हजार ५५ कुटुंबातील ४ हजार ४५१ व्यक्ती, अपर सांगली ग्रामीणमधील ६ हजार ६७ कुटुंबातील २४ हजार ८०६ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील वाळवा क्षेत्रातील ७ हजार ९१८ कुटुंबातील ३९ हजार ५९० व्यक्तींचे तर अपर आष्टा क्षेत्रातील ३ हजार ७२४ कुटुंबातील १९ हजार ६० व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील १ हजार २८६ कुटुंबातील ६ हजार ५६५ व्यक्तींचे, पलूस तालुक्यातील ७ हजार ५८५ कुटुंबातील ३७ हजार ३५० व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे.  लोकांसह जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले. मिरज तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्र (शहरी) २९६, मिरज ग्रामीण क्षेत्रातील ४ हजार ९५२, अपर सांगली ग्रामीण क्षेत्रातील ४ हजार १२९, वाळवा क्षेत्रातील ८ हजार १४५, अपर आष्टा क्षेत्रातील १ हजार ६७७, शिराळा तालुक्यातील ३ हजार ८१४, पलूस तालुक्यातील ८ हजार ९९० जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com