Agriculture news in marathi The floods in Sangli started receding | Page 3 ||| Agrowon

सांगलीतील पूर ओसरू लागला  

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली शहराला मोठा फटका बसला होता. सोमवारी (ता. २६) विळखा सैल होऊ लागला आहे. पुराचे पाणी उतरू लागले आहे. 

सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली शहराला मोठा फटका बसला होता. सोमवारी (ता. २६) विळखा सैल होऊ लागला आहे. पुराचे पाणी उतरू लागले आहे. सांगलीत सकाळी नऊ वाजेपर्यंत दीड फूट पाणी उतरले आहे त्यामुळे काही परिसर आता रिकामा झाला आहे. भिलवडी येथे एक फूट पाणी पातळी उतरली आहे, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठचा परिसर गेल्या तीन दिवसांपासून महापुराचा बुडाला होता. आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी ५५ फुटांचा जवळ पोहोचली होती, मात्र कोयना आणि वारणा धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी केल्याने पुराचे पाणी वाढले नाही. रविवारी (ता. २५) सकाळी अकरावाजेपासून पाणीपातळी स्थिर राहिली. त्यानंतर सायंकाळी पाचपासून हळूहळू पाणी उतरण्यास सुरुवात झाली.

जिल्ह्यातील बहे पूल रविवारी सकाळीच रिकामा झाला. त्यानंतर ताकारी पुलाजवळ हळूहळू पाणी उतरत होते. मात्र सांगली आणि भिलवडीत पाणी पातळी सुमारे पाच तास स्थिर होती. सांगलीत सोमवारी सकाळी नऊ वाजता ५३.२ इंच इतकी पाणी पातळी होती. सुमारे दीड फूट पाणी पातळी असल्यामुळे गणपती पेठ, सराफ कट्टा परिसर मोकळा झाला. मात्र त्याला एसटी स्टँड परिसर, मारुती चौक, मारुती रोड, हिराबाग कॉर्नर, स्टेशन रोड तसेच उपनगरांमध्ये अद्यापही पाणी असल्याने नागरिकांना पूर उतरण्याची अजून काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

दोन लाख जणांसह, ३२ हजारांहून अधिक जनावरांचे स्थलांतर 
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपट्यातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. आतापर्यंत ४१ हजार ८४ कुटुंबातील १ लाख ९६ हजार ९५७ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच लहान व मोठी, अशा एकूण ३२ हजार ३ जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. 
स्थलांतरित व्यक्तींमध्ये मिरज तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्र (शहरी) १३ हजार ४४९ कुटुंबांमधील ६५ हजार १३५ व्यक्ती, मिरज ग्रामीण क्षेत्रातील १ हजार ५५ कुटुंबातील ४ हजार ४५१ व्यक्ती, अपर सांगली ग्रामीणमधील ६ हजार ६७ कुटुंबातील २४ हजार ८०६ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे.

वाळवा तालुक्यातील वाळवा क्षेत्रातील ७ हजार ९१८ कुटुंबातील ३९ हजार ५९० व्यक्तींचे तर अपर आष्टा क्षेत्रातील ३ हजार ७२४ कुटुंबातील १९ हजार ६० व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील १ हजार २८६ कुटुंबातील ६ हजार ५६५ व्यक्तींचे, पलूस तालुक्यातील ७ हजार ५८५ कुटुंबातील ३७ हजार ३५० व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. 

लोकांसह जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले. मिरज तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्र (शहरी) २९६, मिरज ग्रामीण क्षेत्रातील ४ हजार ९५२, अपर सांगली ग्रामीण क्षेत्रातील ४ हजार १२९, वाळवा क्षेत्रातील ८ हजार १४५, अपर आष्टा क्षेत्रातील १ हजार ६७७, शिराळा तालुक्यातील ३ हजार ८१४, पलूस तालुक्यातील ८ हजार ९९० जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 
 


इतर बातम्या
मराठवाड्यात नुकसानग्रस्त पिकांचे ६७.२६...औरंगाबाद : प्राथमिक अंदाजात जवळपास १५ लाख हेक्‍...
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त...नांदेड : जिल्ह्यात जुले, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये...
जळगावातील धरणांत ८० टक्के उपयुक्त...जळगाव ः जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत लावलेल्या...
ऊसबिलाचे तुकडे पाडू  दिले जाणार नाहीत...सातारा : ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाहीत,...
'लासलगाव'च्या कांद्याला टपाल पाकिटावर...नाशिक : कांदा पिकासाठी लासलगाव परिसराची राष्ट्रीय...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...