Agriculture news in marathi The floodwaters rose, Inches began to oscillate | Page 2 ||| Agrowon

कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने ओसरू लागला

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 जुलै 2021

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत आहे. जे पाणी द्रुतगतीने वाढले, त्याचा उतार मात्र संथ गतीने होत असल्याने जिल्ह्यात चिंता कायम आहे. 

कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत आहे. जे पाणी द्रुतगतीने वाढले, त्याचा उतार मात्र संथ गतीने होत असल्याने जिल्ह्यात चिंता कायम आहे. पाणी लवकर ओसरत नसल्याने शेतीचे नुकसान वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एका दिवसात जे पाणी आठ ते दहा फुटाने वाढले तेच पाणी आता पाऊस थांबून चार दिवस झाले तरी ही केवळ दिवसाला एक ते दोन फुटांनी उतरत आहे. परिणामी शिवारे अजूनही पुराच्या पाण्याने वेढलेली आहेत. पाणी जास्त दिवस थांबून राहत असल्याने विशेष करून खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे. बहुतांशी नद्या अजूनही धोका पातळीवर आहेत. चार दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात पूर्ण विश्रांती घेतली आहे, तरीही नद्यांचे पाणी गतीने ओसरत नाही. 

जिल्ह्यात पंचगंगेचे पाणी कोल्हापूर शहर परिसरात काहीशा गतीने कमी होत आहे, तर इचलकरंजी, शिरोळ, कुरुंदवाड या पूरपट्ट्यात नदीचे पाणी उतरण्याची गती अत्यंत धीमी आहे. दिवसाला केवळ एक ते दोन फूट पाणी या भागातून कमी होत आहे. हीच परिस्थिती वारणा व कृष्णा नदीच्या काठावर असणाऱ्या गावांची आहे. यामुळे गावठाणातील पाणी कमी होत असली तरी शेतीतील पाणी तसेच वाहत आहे.  पूरपट्यात अजूनही महापुराने वेढलेली ८० टक्के शेतीत पाणी आहे. पाणी जास्त दिवस साचून राहत असल्याने खरीप पिके पूर्णपणे हातची जाण्याचा धोका आहे. तसेच वाढीच्या अवस्थेतील उसाला याचा मोठा फटका बसेल, अशी शक्यता आहे. दरम्यान पूर ओसरू लागल्याने अनेक महत्त्वाचे मार्ग रिकामे होऊ लागले आहेत.

महापूर हटू लागला; बाजार उघडला
सांगली : कृष्णा नदीचा महापूर ओसरू लागताच सांगलीकरांनी आपली घरे, व्यवसाय, संसार सावरण्याची धडपड सुरू केली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी सांगलीत ४८.६ फुटांवर पाणी होती. सोमवारची सकाळ सांगलीकरांसाठी दुहेरी दिलासा देणारी ठरली. एकीकडे कृष्णा नदीच्या महापुराने संथ का असेना, मात्र परतीचा प्रवास सुरू केला तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने तब्बल ९५ दिवसांनंतर बाजारपेठा उघडल्या.

लोकांनी दुकाने, व्यापारपेठांसह तळघरातील पाणी स्वच्छतेसाठी इंजिन, मोटरी, एचटीपीने पाणी काढण्यासह स्वच्छता सुरू झालेली आहे. महापूरग्रस्तांना तातडीची दहा हजारांची मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केली आहे. दहा किलो गहू, दहा किलो तांदूळ, पाच किलो डाळीची मदत सरकारने जाहीर केली आहे. पूर तासाला इंचभराने कमी होतो आहे.


इतर बातम्या
सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...
मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...
तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...