agriculture news in Marathi floriculture on the way of distroy Maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यातील फुलशेतीला २५ कोटींचा फटका

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 एप्रिल 2020

मी अनेक वर्षांपासून फुलशेती करतो. सध्या वीस गुंठे झेंडू व तीन एकरावर गुलाब आहे. उन्हाळ्यात गुलाबला मागणी चांगली असल्याने ३०० नगाला तीनशे रुपये तर किलोला दोनशे ते आडीचशे रुपयाचा दर मिळतो. यंदा मात्र एम मागणीच्या काळात लॉकडाऊन झाल्याने मोठे नुकसान होत आहे. लाखमोलाची फुले फेकून द्यावी लागत आहेत. फुलउत्पादकांना आधार मिळाला नाही तर फुलशेती उध्वस्त होईल. 
- अमोल गाडेकर, फुलोत्पादक शेतकरी, निमगाव, ता. राहाता, जि. नगर. 

नगरः ‘कोरोना’ संसर्गामुळे गेल्या महिनाभरापासून वाहतूक बंद असल्याचा गंभीर परिणाम फुल शेतीवर झाला आहे. फुलांची राज्यासह परराज्यात वाहतूक बंद आहे. शिवाय शिर्डीसह जिल्हाभरातील प्रमुख देवस्थानही बंद आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यामधील फुल उत्पादकांना महिनाभरात सुमारे पंचवीस कोटींचा फटका बसला आहे. होणारा खर्चही निघत नसल्याने जिल्ह्यात फुलशेती उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. 

नगर जिल्ह्यामधील नगर, पारनेर, राहाता, संगमनेर, अकोले तालुक्यात फुलशेती केली जाते. जिल्हाभरात सुमारे पाचशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर फुलशेती असून पारनेर, नगर तालक्यातील गुलछडी, राहाता संगमनेर, अकोले भागात झेंडू, गुलाब, सब्जाचे उत्पादन घेतले जाते.

फुल उत्पादनासाठी नगर जिल्ह्यात सुमारे तीनशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पॉलिहाऊस, शेडनेट उभारले आहे. स्थानिक पातळीवर साधारण चाळीस टक्के तर साठ टक्के वाहतुकी द्वारे हैद्राबाद, बडोदा, नागपूर भागात पाठवली जातात. बहुतांश फुलांची वाहतूक एसटी, ट्रॅव्हल्स व वैयक्तिक वाहनांतून केली जाते. 

राहाता तालुक्यात सुमारे पन्नास पेक्षा अधिक गावांत फुलशेती केली जात असून त्यात बहुतांश उत्पादक हे गुलाबशेती करतात. या भागातील ७० टक्के फुले शिर्डी येथे वापरली जातात. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले आणि हा बंद फुलशेतीच्या मुळावर आला.

फुलशेतीतून दररोज होणारी ७० ते ८० लाखाची उलाढाल पूर्णतः थांबली. फुलांची दर दिवसाला तोडणी करावी लागते, अन्यथा दोन दिवसांत फुले खराब होतात व त्याचा परिणाम झाडांवर होतो. त्यामुळे फुलोत्पादकांना नाइलाजाने लाख मोलाची फुले तोडून बांधावर टाकावी लागत आहेत. 

अनेक शेतकरी तोडलेली फुले जनावरांनाही खाऊ घालत आहेत. राहाता तालुक्यातील फुलांचा शिर्डीत वापर होतो. दर दिवसाला चार ते पाच लाखाची फुल उत्पादनातून उलाढाल होते, गेल्या महिनाभरापासून साईबाबा दर्शनही बंद असल्याने येथील फुलोत्पादकही आर्थिक फटका सहन करीत आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात केवळ फुलशेतीतून सुमारे २५ कोटीचे नुकसान झाले आहे. फुलशेतीची उलाढालच बंद असल्याने व मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याने फुलशेती उध्वस्त होते की काय अशी भिती जाणकार व्यक्त करत आहेत. 
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...
गुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...
राहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...
कापूस हंगाम लांबणीवर?नागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण...
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी...परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी...
देशी गोपालनातून शेती केली शाश्वतकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक...
रेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...
मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...
खावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...
मुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...
कृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्वसिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या...
इथेनॉलकडे साखर वळविणारकोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा...
मराठवाडा, विदर्भात उद्या पावसाचा अंदाज पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे....
अभूतपूर्व साखर साठ्याचे संकट पुणे: राज्यात ७२ लाख टन साखर शिल्लक असताना येत्या...
श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीप्रमाणे...पुणे ः आठवडे बाजारात थेट विक्रीच्या माध्यमातून...