कृषी योजनांसाठी अर्जांचा ओघ सुरुच

कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, सिंचन साधने व सुविधा, फलोत्पादन यातून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी नगर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून अर्जाचा ओघ सुरुच आहे.
The flow of applications for agricultural schemes continues
The flow of applications for agricultural schemes continues

नगर ः कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, सिंचन साधने व सुविधा, फलोत्पादन यातून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी नगर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून अर्जाचा ओघ सुरुच आहे. दोन वर्षात तब्बल पाच लाख १८ हजार ३५५ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील ९३ हजार अर्जाची निवड केली. 

एकाच अर्जात अनेक लाभ मागण्याची सुविधा असल्याने अर्जाची संख्या वाढत आहे. मात्र, नको असलेल्या लाभासाठी नाव आल्यामुळे लाभ घेतला जात नसल्याने अर्ज रद्द केले जात आहे. दोन वर्षात तब्बल वीस हजार अर्ज रद्द केले आहेत.

शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण उपअभियान यासह कृषी विभागाच्या विविध योजनांचे अर्ज करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून महाडीबीटी पोर्टलचा वापर केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी झाला, शिवाय अर्जाची संख्या वाढली. मात्र, एकाच अर्जावर अनेक योजनांच्या अनुदानाची मागणी करण्याची सुविधा असल्याने अर्जाची संख्या वाढत आहे. 

एकापेक्षा अधिक लाभासाठी अर्जात सुविधा असल्याने अनेक लाभार्थ्यांना नको असलेला लाभ मिळत आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी लाभ नाकारत आहेत. वेळेत लाभ घेतला नाही तर अर्ज रद्द केला जात आहे. गेल्यावर्षी साधारणपणे दोन ते तीन

महिने लाभ घेण्याची कृषी विभागाला प्रतीक्षा करावी लागत होती. आता मात्र साधारणपणे पंधरा दिवसांत लाभ घेतला नाही तर निवड रद्द केली जात आहे. अपूर्ण अर्ज, अर्जातील त्रुटी आणि लाभ न घेतल्याने निवड झालेले सुमारे वीस हजार अर्ज रद्द केले आहे. २०२०-२१ मध्ये निवड न झालेले लाभार्थी अर्ज पुढील वर्षात (२०२१-२२) मध्ये ग्राह्य धरले आहेत. 

कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण, फलोत्पादन, सिंचन साधने व सुविधा, अनुसूचित जाती-जमाती योजना आदी योजनांसाठी दोन वर्षात ५ लाख १८ हजार, ३५५ अर्ज आले आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या योजनांसाठी येत असलेल्या अर्जाची स्थिती पाहता नगर जिल्ह्यात अर्जाचा ओघ दोन वर्षापासून कायम असल्याचे दिसत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com