agriculture news in marathi, The flow of Hantanur dam came down | Page 2 ||| Agrowon

हतनूर धरणात येणारा प्रवाह आटला
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 ऑगस्ट 2018
जळगाव : जिल्ह्यातील तापी नदीवरील हतनूर धरणाचे मागील महिन्याच्या मध्यात उघडे असलेले १० दरवाजे बंद करून दोन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडे केले आहेत. त्यातून २२८६ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  
 
जळगाव : जिल्ह्यातील तापी नदीवरील हतनूर धरणाचे मागील महिन्याच्या मध्यात उघडे असलेले १० दरवाजे बंद करून दोन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडे केले आहेत. त्यातून २२८६ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  
 
पाऊस नसल्याने हतनूरमध्ये मध्य प्रदेशातून येणारा पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे टप्प्याटप्प्याने बंद केले आहेत.  गिरणा, वाघूर या धरणांमध्ये कुठलाही पाण्याचा प्रवाह सध्या येत नसल्याची माहिती आहे. हतनूर धरणात २०.७१ टक्के, तर वाघूरमध्ये ३४.४९ टक्के जलसाठा आहे. गिरणा धरणातील साठा काहीसा वाढून २७.२० टक्के झाला आहे.
सातपुडा पर्वतानजीकच्या रावेर तालुक्‍यातील अभोरा प्रकल्पात ४२.८७, मंगरूळ प्रकल्पात ४४.९८, सुकीमध्ये ५५.२७ व मोर प्रकल्पात २४.५२ टक्के जलसाठा आहे. सुकी नदीला जूनमध्ये पूर आला होता. त्या वेळेस या धरणात पाण्याचा प्रवाह आला. नंतर मात्र जोरदार पाऊस नसल्याने या धरणातील जलसाठा वाढला नाही.
पारोळा तालुक्‍यातील अग्नावती व भोकरबारी प्रकल्पांतील साठा शून्यच आहे. चाळीसगाव तालुक्‍यातील मन्याड प्रकल्पासह पाचोरा तालुक्‍यातील बहुळा प्रकल्पामध्ये मृतसाठा शिल्लक आहे. इतर लघुप्रकल्प, तलाव यांच्यातही फारसा साठा झालेला नाही. जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांद्वारे झालेला जलसाठाही आटत आहे.

इतर ताज्या घडामोडी
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पुणे ः उत्तर, दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे...
अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत अतिवृष्टीअकोला ः मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात दमदार...
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
औरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...