‘म्हैसाळ’ योजनेचा उपसा थांबला

‘म्हैसाळ’ योजनेचा उपसा थांबला
‘म्हैसाळ’ योजनेचा उपसा थांबला

सांगली : म्हैसाळ योजनेचा उपसा थांबवण्यात आला अाहे. दीड महिन्यांत योजनेतून तब्बल पाच टीएमसी पाण्याचा उपसा झाला. मिरजेसह पाच तालुक्‍यांतील वीस हजार हेक्‍टर शेतीला पाणीपुरवठा झाला. या दरम्यान या योजनेची अडीच कोटींची पाणीपट्टी वसूल झाली आहे.

जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने आणि पाण्याची मागणी कमी झाल्याने मोटारी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने थकबाकीपोटी पंधरा कोटी रुपये दिल्यानंतर २४ मार्च रोजी उपसा सुरू करण्यात आला होता. किरकोळ बिघाड वगळता उपसा अखंड सुरू राहिला. म्हैसाळ योजनेच्या असणाऱ्या एकूण १०३ पंपांपैकी अगदी ८० पंप सक्षमपणे सुरू राहिले. तीनही महिन्यांत ७० ते ७८ ची पंपसंख्या सरासरीने राहिली आहे. यापूर्वी ती फक्त ६५ पर्यंत जाऊ शकली होती. सर्व पंप सरासरी ८०० ते ११०० अश्‍वशक्ती इतक्या क्षमतेचे असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी उपसता आले.

मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत व सांगोला तालुक्‍यांत पाणी गेले. १०३ दिवसांच्या उपशानंतर पंपांना विश्रांती देण्यात आली. या कालावधीत वारणेचे पाच टीएमसी पाणी वापरण्यात आले. जूनअखेरचे वीजबिल वीस कोटी रुपयांवर गेले आहे. पैकी ८१ टक्के रक्कम शासन देणार आहे. उर्वरित १९ टक्के शेतकऱ्यांना भरावे लागतील. ही रक्कम चार कोटी रुपये होते.

मार्चपासून शेतकऱ्यांनी अडीच कोटी रुपये जमा केले आहेत. पाणी पिण्यासाठी सोडले असल्याने त्याचे सुमारे साडेतीन कोटी रुपये शासनाकडून मिळतील. चार कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे. यंदाच्या उपशाची वसुली सुमारे ऐंशी टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाल्याने पुढील हंगामात मागणी करताच आवर्तन सुरू होणार आहे.

‘उपसा थांबल्याने योजनेच्या देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत. सर्व पंप, आरग, बेडग आणि सलगरे कालवे यांची दुरुस्ती केली जाणार आहे. वितरिका व पोटकालव्यांवर व्हॉल्व्ह बसवले जातील. कालव्यांची गळती शंभर टक्के बंद करण्याचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांसह सर्वांच्या सहकार्याने आवर्तन यशस्वी करता आले. यंदा वसुली चांगली झाल्याने पुढील आवर्तन वेळेत सुरू होऊ शकते.’ -एस. एम. नलवडे, कार्यकारी अभियंता

असे झाले आवर्तन वीस हजार हेक्‍टर शेती ओलीताखाली मेअखेरचे वीजबिल पंधरा कोटी रुपये शेतकऱ्यांनी भरले अडीच कोटी रुपये शासनाकडून साडेतीन कोटी येणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com