औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल

औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २०) फ्लॉवरची ३७ क्‍विंटल आवक झाली. त्याला १८०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १३३ क्‍विंटल आवक झाली. तिला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५१९ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर ६०० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १०१ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला १५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वांग्यांची आवक ४२ क्‍विंटल, तर दर ६०० ते १५०० रुपये, गवारीची ३२ क्‍विंटल आवक, तर दर १५०० ते ३००० रुपये, भेंडीची आवक ७४ क्‍विंटल, तर दर ८०० ते १२०० रुपये, चवळीची २० क्‍विंटल आवक, तर दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल मिळाला. १३ क्‍विंटल आवक झालेल्या मकाला ७०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

काकडीची आवक ४६ क्‍विंटल, तर दर १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १८ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबांना १२०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कारल्याची आवक ३८ क्‍विंटल, तर दर १२०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. दुधी भोपळ्याची आवक १३ क्‍विंटल, तर दर ५०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ८८ क्‍विंटल आवक झालेल्या कोबीला २००० ते २५०० रुपये दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची आवक ३३ क्‍विंटल, तर दर ३००० ते ३५०० रुपये, शेवग्याची ४ क्‍विंटल आवक, तर दर ३००० ते ५५०० रुपये, भुईमूग शेंगांची आवक ३४ क्‍विंटल, तर दर ४००० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २० क्‍विंटल आवक झालेल्या दिलपसंदला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

काशीफळाची आवक ३१ क्‍विंटल, तर दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १३ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर २५०० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १४ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला १००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

खजूरची आवक ३७ क्‍विंटल, तर दर २५०० ते ५००० रुपये, आंब्याची २३ क्‍विंटल आवक, तर दर ३००० ते ६५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ९ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला १००० ते १५०० रुपये, ७ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकाला ८०० ते ९०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाले. २५ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला २०० ते ७०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com