परभणीत फ्लॉवर ३५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल

परभणीत फ्लॉवर ३५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल
परभणीत फ्लॉवर ३५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल

परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २४) फ्लॅावरची २५ क्विंटल आवक झाली. फ्लाॅवरला प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल २००० ते ३००० दर मिळाले. गवारीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले. चवळीची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये पालकाची १५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. शेपूची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले.

चुक्याची ५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. मेथीच्या ४ हजार जुड्यांची आवक झाली. त्यास प्रतिशेकडा ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ६० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. वांग्याची ४५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल १२०० ते २५०० रुपये दर मिळाले.

टोमॅटोची ६०० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ४५ क्विंटल आवक झाली.  त्यास प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. भेंडीची १५ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये मिळाले. कोबीची ३० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची ५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल ४००० ते ५००० रुपये दर मिळाले. दोडक्याची ७  क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले.  दुधी भोपळ्याची १० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये दर मिळाले. काकडीची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये दर मिळाले.

कंदवर्गीय भाज्यांमध्ये बिट रुटची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये दर मिळाले. फळांमध्ये कैरीची ३०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये दर मिळाले. लिंबांची १५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ६००० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com