Agriculture news in Marathi Flower farm damage due to lockdown | Agrowon

नेरच्या शेतकऱ्यांची सोन्यासारखी फुले मातीमोल

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 एप्रिल 2020

देऊर, जि. धुळे : जगासह देशात ‘कोरोना’ विषाणूने धुमाकूळ घातलेला आहे. या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन केल्यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. शेतमालाला बाजारपेठेत मागणी नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. सोळा दिवसांपासून देशात लॉकडाऊन आहे. बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. याचा फटका फुलशेतीलाही बसला आहे. 

देऊर, जि. धुळे : जगासह देशात ‘कोरोना’ विषाणूने धुमाकूळ घातलेला आहे. या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन केल्यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. शेतमालाला बाजारपेठेत मागणी नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. सोळा दिवसांपासून देशात लॉकडाऊन आहे. बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. याचा फटका फुलशेतीलाही बसला आहे. 

धुळे तालुक्यातील नेर येथील फुलशेती बागायतदार शेतकरी तुकाराम माळी यांनी आपल्या शेतामध्ये तेरा एकरवर झेंडू, गुलाब, मोगरा, लिली, निशिगंधा, गॅलेंडर, लिली आदि फुलाची बाग फुलवली होती. मात्र, हीच फुलं आता खुडून त्यांना फेकून द्यावी लागली आहेत. उर्वरित गॅलेंडर शेतीवर नाइलाजाने रोटाव्हेटर मारावे 
लागले आहे.

आत्तापर्यंत सत्तर हजारांवर नुकसान झाले आहे. झेंडूच्या फुलांच्या शेतीसाठी माळी कुटुंबाने रोप लागवड, मशागत, फवारणीचे औषधे, खते, तोडणीसाठी मजुरी असा अडीच लाख रुपयांचा खर्च केला आहे. यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासह ही संपूर्ण बाग फुलवली आहे. फुलाच्या विक्रीमधून चांगले उत्पन्न पदरात पडेल, अशी अपेक्षा त्यांना होती. पाडवा व लग्नसराईचे दिवस पाहून झेंडू, गॅलेंडर, गुलाब, मोगरा, निशिगंधा, लिली बाग देखील फुलांनी सजवली होती. झेंडूना मोठी फुलेही लागली. 

‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे सध्या तरी मार्केट बंद असल्याने झाडांना इजा होऊ नये म्हणून उमललेली फुले तोडून रस्त्यावर टाकायची वेळ येत आहे. झाडावरून फूल तोडली नाहीत तर फुलझाडाची शक्ती कमी होते. बहार कमजोर होतो. पुढे अपेक्षा आहे. बाजारपेठ सुरू होणार. त्यामुळे फुलशेती टिकवावी लागत आहे.  सर्व काही बंद असल्याकारणाने फुलांची व्यवस्था कशी करावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे ऐन सणासह लग्न हंगामही धोक्‍यात आल्याने व बाजारपेठा बंद आहे. त्यामुळे झेंडूच्या मालाला उठावच नाही. फूल उत्पादक शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला आहे. माझ्यासारखे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फुलाची झाडे टिकविण्यासाठी व पुढील कळ्या उमलण्यासाठी उमललेली फुले तोडून टाकण्याशिवाय आम्हाला पर्याय उरला नाही. प्रशासनाने विचार करून मदत करावी.
— तुकाराम माळी, फुलशेती बागायतदार, नेर, ता. धुळे


इतर ताज्या घडामोडी
पावसाच्या तडाख्याने साताऱ्यात हातची...कऱ्हाड, जि. सातारा ः चांगल्या पावसामुळे यंदाचा...
परभणी जिल्ह्यात पुरामुळे पिके पाण्याखालीपरभणी  : जायकवाडी आणि माजलगाव धरणातील...
सोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन...शिरपूरजैन, जि. वाशीम  ः यावर्षी सातत्याने...
वऱ्हाडातील मोठे प्रकल्प तुडुंबअकोला  ः आत्तापर्यंत झालेल्या पावसाने काही...
खानदेशात पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत पिके...जळगाव  ः खानदेशात उडीद, मुगाचे अपूर्ण...
पुणे विभागात आडसाली ऊस लागवड क्षेत्र...पुणे  ः चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान...सांगली  ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस,...
केळी पिकातील कंद कुजव्या रोगाचे...कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून...
वाढवा जमिनीतील सेंद्रिय कर्ब...जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी...
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...