Agriculture news in marathi Flower Festival should be celebrated in a bigger way: Actress Tuljapurkar | Agrowon

पुष्पोत्सव अधिक मोठ्या स्वरूपात साजरा करावा : अभिनेत्री तुळजापूरकर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

नाशिक : ‘नाशिक महापालिका राबवत असलेला पुष्पोत्सवाचा उपक्रम देखणा व रेखीव आहे. त्या माध्यमातून पुष्पप्रेमींना मोठी पर्वणी असते, पुढील वर्षीपासून अधिक मोठ्या स्वरूपात साजरा करावा’, अशी अपेक्षा अभिनेत्री प्रिया तुळजापूरकर यांनी व्यक्‍त केली. 

नाशिक : ‘नाशिक महापालिका राबवत असलेला पुष्पोत्सवाचा उपक्रम देखणा व रेखीव आहे. त्या माध्यमातून पुष्पप्रेमींना मोठी पर्वणी असते, पुढील वर्षीपासून अधिक मोठ्या स्वरूपात साजरा करावा’, अशी अपेक्षा अभिनेत्री प्रिया तुळजापूरकर यांनी व्यक्‍त केली. 

नाशिक महापालिकेच्या वतीने आयोजित पुष्पोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी महापौर सतीश कुलकर्णी, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, उपायुक्त (उद्यान) शिवाजी आमले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुवारी (ता.२०) उद्‌घाटन झाल्यावर गत चार दिवसांत लाखभर नाशिककरांनी पुष्पोत्सवास भेट देऊन फुलांचे प्रकार, पुष्परचना अनुभवल्या. महोत्सवात शेवटच्या दिवसापर्यंत चाळीस लाख रुपयांच्या विविध रोपांची विक्री झाली. गत चार दिवसांत पुष्पोत्सवास नाशिककरांनी सहकुटुंब भेट दिल्याचे उपायुक्त शिवाजी आमले यांनी सांगितले. 

वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षीपासून हे प्रदर्शन जानेवारीतच भरविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी समारोपाच्या सत्रात बोलताना महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हे पुष्पप्रदर्शन पुढील वर्षीपासून गोल्फ क्‍लब मैदानावर भरविण्याची कल्पना मांडली.  सोनू काठे यांच्या फुलाने गुलाबपुष्प गटात सादर केलेल्या पिवळ्या व केशरी फुलाला प्रथम व द्वितीय क्रमांक मिळाला. याशिवाय सेल्फी पॉइंट उभारण्यात योगदान देणाऱ्या समीर मांजरेकर व गोकूळ पाटील यांचाही गौरव करण्यात आला. व्यक्तिचित्र रांगोळीतील योगदानाबाबत सुनील देवपूरकर; तर वार्ली पेंटिंग्जसाठी प्रेमदा दांडेकर यांना प्रथम क्रमाकांने गौरविण्यात आले.
 


इतर ताज्या घडामोडी
राज्यात वळीव पावसाचा दणका सुरूच पुणे : राज्यातील पुणे, नगर, जालना, यवतमाळ,...
गरजूंसाठी या बळीराजाने खुली केली...नाशिक : सध्याच्या टाळेबंदीच्या काळात हातावर...
मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढमुंबई  : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता...
अंकुशनगर परिसरात पावसाचा दणका अंकूशनगर, जि. जालना: एकिकडे कोरोनाचे सावट...
परराज्यातील कामगार, कष्टकऱ्यांची पूर्ण...मुंबई : जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची कमी नाही,...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरातनवी दिल्ली : महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगात...
मुंबई बाजार समितीत आज व्यापाऱ्यांचा...मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू...
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ११ हजार...अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
वऱ्हाडातील ६५ हजारांवर नागरिक गावी परतलेअकोला ः रोजगार, नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये...
अकोल्यातील दिड हजारांवर शेतकऱ्यांची...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
जिल्हा परिषदेचे दीड लाख कर्मचारी देणार...नगर ः कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यासाठी...
नगर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाचा...नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी...
शेतमाल निर्यातीसाठी वाणिज्य मंत्रालयाने...नागपूर  ः राज्यात जारी करण्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पाऊस औरंगाबाद/जालना: दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ६७...
कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना फटकासोलापूर ः खास उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून...
राज्य तलाठी संघांकडून एक दिवसाचे वेतन...परभणी ः कोरोना बाधितांच्या मदतीसाठी तलाठी, मंडल...
नांदेड येथे वाहतूक प्रमाणपत्र कक्ष...नांदेड ः अत्यावश्यक सेवा, वस्तू यांचा पुरवठा...
सांगली, मिरज, कुपवाड शहरात घरपोच...सांगली ः महापालिकेतर्फे सांगली, मिरज आणि कुपवाड...
नगर जिल्ह्यात लाख मोलाची फुले होताहेत...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर परराज्यातील...