पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला

पुणेः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच महिने बंद असलेल्या फूल बाजाराला नवरात्र आणि दसऱ्या निमित्त झळाळी आली आहे.
Flower market flourished in Pune on the occasion of Dussehra
Flower market flourished in Pune on the occasion of Dussehra

पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच महिने बंद असलेल्या फूल बाजाराला नवरात्र आणि दसऱ्या निमित्त झळाळी आली आहे.

आज रविवारी (ता.२५) साजऱ्या होणाऱ्या विजयादशमी (दसरा) निमित्त फूल बाजार झेंडू, शेवंती या प्रमुख फुलांबरोबर विविध फुलांनी गजबजला होता. राज्याच्या विविध भागातून गेल्या दोन दिवसांपासून झेंडू आणि शेवंतीची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. तर, मागणी वाढल्याने दरात देखील मोठी वाढ झाली. झेंडू आणि शेवंती या प्रमुख फुलांना शनिवारी (ता.२४) प्रति किलोला अनुक्रमे ५० ते १५० आणि १५० ते ३०० रुपये दर मिळाला. 

हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी पांडुरंग पवार (रा. पळशी, ता. शेणगाव) म्हणाले,‘‘ यावर्षी नवरात्र आणि दिवाळीचे नियोजन करून एक एकरवर भगवा आणि पिवळ्या झेंडूची लागवड केली आहे. नवरात्रात दोन वेळा १५० -१५० क्रेट विक्रीसाठी आणले होते. घटस्थापनेला ५० ते ८० तर, उद्याच्या दसऱ्याच्या निमित्ताने शनिवारी ९० ते १५० रुपये दर मिळाला. आम्ही दोघा शेतकऱ्यांनी एक पिकअप गाडी फुले आणली होती. पावसाचा जरा फटका बसला. फुले काळी पडली. मात्र दर चांगला मिळाला, याचे समाधान आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सुनील बनसोडे (पिसरे, ता. करमाळा) यांनी देखील नवरात्र, दिवाळीचे नियोजन करून, २ एकर क्षेत्रावर पिवळा आणि भगव्या झेंडूची लागवड केली आहे. त्यांना देखील ८० ते १०० रुपये दर मिळाल्याचे सांगितले. 

अनेक शेतकऱ्यांनी पावसाच्या भीतीने आगाऊ फुले काढून दोन दिवस सुकवून आणल्याचे सांगितले. यामुळे सुक्या फुलांना चांगले दर मिळाल्याचे अनुभव शेतकऱ्यांनी सांगितले. 

कोरोना संकटानंतर सर्वाधिक आवक शुक्रवारी आणि शनिवारी झाली आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा दिवाळी हे फूल उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे हक्काचे हंगाम असतात. यामध्ये प्रामुख्याने दसऱ्याच्या दोन दिवस अगोदर झेंडू आणि शेवंतीच्या फुलांची आवक आणि मागणी वाढते. यावर्षी पावसामुळे फटका बसला. तरीही झेंडू, शेवंतीला चांगली मागणी राहिल्याने दर देखील १०० ते २५० पर्यंत मिळाले.  - प्रदीप काळे,  विभागप्रमुख फूल विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com