agriculture news in marathi Flower market flourished in Pune on the occasion of Dussehra | Agrowon

पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच महिने बंद असलेल्या फूल बाजाराला नवरात्र आणि दसऱ्या निमित्त झळाळी आली आहे.

पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच महिने बंद असलेल्या फूल बाजाराला नवरात्र आणि दसऱ्या निमित्त झळाळी आली आहे.

आज रविवारी (ता.२५) साजऱ्या होणाऱ्या विजयादशमी (दसरा) निमित्त फूल बाजार झेंडू, शेवंती या प्रमुख फुलांबरोबर विविध फुलांनी गजबजला होता. राज्याच्या विविध भागातून गेल्या दोन दिवसांपासून झेंडू आणि शेवंतीची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. तर, मागणी वाढल्याने दरात देखील मोठी वाढ झाली. झेंडू आणि शेवंती या प्रमुख फुलांना शनिवारी (ता.२४) प्रति किलोला अनुक्रमे ५० ते १५० आणि १५० ते ३०० रुपये दर मिळाला. 

हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी पांडुरंग पवार (रा. पळशी, ता. शेणगाव) म्हणाले,‘‘ यावर्षी नवरात्र आणि दिवाळीचे नियोजन करून एक एकरवर भगवा आणि पिवळ्या झेंडूची लागवड केली आहे. नवरात्रात दोन वेळा १५० -१५० क्रेट विक्रीसाठी आणले होते. घटस्थापनेला ५० ते ८० तर, उद्याच्या दसऱ्याच्या निमित्ताने शनिवारी ९० ते १५० रुपये दर मिळाला. आम्ही दोघा शेतकऱ्यांनी एक पिकअप गाडी फुले आणली होती. पावसाचा जरा फटका बसला. फुले काळी पडली. मात्र दर चांगला मिळाला, याचे समाधान आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सुनील बनसोडे (पिसरे, ता. करमाळा) यांनी देखील नवरात्र, दिवाळीचे नियोजन करून, २ एकर क्षेत्रावर पिवळा आणि भगव्या झेंडूची लागवड केली आहे. त्यांना देखील ८० ते १०० रुपये दर मिळाल्याचे सांगितले. 

अनेक शेतकऱ्यांनी पावसाच्या भीतीने आगाऊ फुले काढून दोन दिवस सुकवून आणल्याचे सांगितले. यामुळे सुक्या फुलांना चांगले दर मिळाल्याचे अनुभव शेतकऱ्यांनी सांगितले. 

कोरोना संकटानंतर सर्वाधिक आवक शुक्रवारी आणि शनिवारी झाली आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा दिवाळी हे फूल उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे हक्काचे हंगाम असतात. यामध्ये प्रामुख्याने दसऱ्याच्या दोन दिवस अगोदर झेंडू आणि शेवंतीच्या फुलांची आवक आणि मागणी वाढते. यावर्षी पावसामुळे फटका बसला. तरीही झेंडू, शेवंतीला चांगली मागणी राहिल्याने दर देखील १०० ते २५० पर्यंत मिळाले. 
- प्रदीप काळे,  विभागप्रमुख फूल विभाग


इतर बाजारभाव बातम्या
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात गुळाच्या नियमित आवकेस...कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या पंधरा...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते २६०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १५० रुपयेकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
कळमना बाजारात मोसंबी दरात सुधारणानागपूर : मागणीअभावी संत्रा दरात घसरण झाली आहे....
औरंगाबादमध्ये गाजर सरासरी १८०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत वाटाणा ३००० ते ४५०० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपयेजळगावात २५०० ते ३५०० रुपये दर जळगाव : ः...
नाशिकमध्ये वांग्यांना सरासरी ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबाद : हिरवी मिरची सरासरी ३०००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत ढोबळी मिरचीची पंधरा क्विंटल आवकपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये...पुण्यात २००० ते ३००० रुपये पुणे : पुणे बाजार...
पपई दर निम्म्यावर; शेतकऱ्यांना फटका जळगाव : खानदेशात गेल्या २० ते २५ दिवसात...
मक्‍याच्या बाजारभावात दौंडमध्ये २००...दौंड, जि. पुणे : दौंड तालुक्‍यात मक्‍याची आवक...