agriculture news in Marathi flower rate up due to Navaratra Maharashtra | Agrowon

नवरात्रोत्सवामुळे फूल बाजाराला `रंग`

टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या फूल शेतीला आता गणेशोत्सवानंतर नवरात्र उत्सवाने दिलासा मिळत आहे. 

पुणे: कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या फूल शेतीला आता गणेशोत्सवानंतर नवरात्र उत्सवाने दिलासा मिळत आहे. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून झालेल्या वादळी पावसाने फुलांचे नुकसान झाले असून, दर्जेदार फुलांना चांगले दर मिळत आहेत. आजपासून (ता.१७) सुरु होत असलेल्या नवरात्र उत्सवामुळे पुणे बाजार समितीमधील फूलबाजार गजबजला होता. 

फुलांची आवक आणि दराबाबतची माहिती देताना आडते अरुण वीर आणि सागर भोसले म्हणाले, की नवरात्रीमुळे फुलांना मागणी वाढली होती. नवरात्र आणि दसऱ्याचे नियोजन करुन शेतकऱ्यांनी विविध फुलांची लागवड केली आहे. मात्र नेमके फुले काढणीच्या हंगामातच गेल्या तीन चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पाऊस झाल्याने फुले मोठ्या प्रमाणावर भिजली.

परिणामी बाजारात ७० टक्के भिजलेल्या खराब फुलांची आवक झाली तर केवळ ३० टक्के चांगल्या फुलांची आवक झाली. यामुळे चांगल्या फुलांना चांगली मागणी आणि दर मिळाले. ही मागणी उद्यापासून कमी होईल. तर दसऱ्याच्या दोन दिवस अगोदरपासून, फुलांची मागणी वाढेल. 

पुणे बाजारातील फुलांचे दर (प्रतिकिलो/रुपये) 
झेंडूः २०-१००, शेवंतीः १००-२५०, गुलछडीः १००-१५०, ॲस्टर जुडीः २०-३०, सुट्टा ॲस्टरः १५०-२५०. 

प्रतिक्रिया
मी दसरा दिवाळीचे नियोजन करुन एक एकर शेवंतीची लागवड केली. मात्र, पावसामुळे फुले भिजली असून, रोज ५० किलोचा तोडा होतोय. गेल्या दोन दिवसांत एका किलोला दर्जानुसार १५० ते २५० रुपये दर मिळाला आहे. दसरा-दिवाळीमध्ये रोज १५० किलो तोडा होण्याचा अंदाज आहे. 
- विनायक शितोळे, यवत, ता.दौड, जि.पुणे 

कोरोना संकटानंतर गणेशोत्सव आणि आता नवरात्र सण साजरा होत आहे. नागरिक अनेक दिवसांपासून सण उत्सवांपासून वंचित असल्याने दसरा सण चांगला साजरा होण्याची शक्यता आहे. यामुळे दसऱ्याला झेंडू आणि शेवंतीला चांगली मागणी राहील आणि दर देखील चांगले राहतील, असा अंदाज आहे. 
- अरुण वीर, अध्यक्ष, फुल बाजार आडते संघटना 


इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये वांगी सरासरी ८५०० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक वाढलीनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये गवार, वांग्याच्या दरात तेजीनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात घेवडा, वांग्याचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
राज्यात केळी ४०० ते ११०० रुपये क्विंटलनाशिकमध्ये ४०० ते १००० रूपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात वाढकोल्हापूर :  येथील बाजार समितीत या सप्ताहात...
सोलापुरात गवार, घेवडा, भेंडीतील तेजी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक सर्वसाधारण; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात सोयाबीन दरातील तेजीबाबत...नागपूर : संततधार पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची...
पुणे बाजारात कांदा दरात सुधारणापुणे ः राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका...
नवरात्रोत्सवामुळे फूल बाजाराला `रंग`पुणे: कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
परभणीत आवळ्यांना सरासरी ११०० रुपये दरपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...