ऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार कोमेजलेलाच

धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक धार्मिक विधी आणि मंदिरे बंद असल्याने यंदा फुलबाजार श्रावणातही कोमेजलेला असल्याचे चित्र आहे. परिणामी फुल उत्पादक व विक्रेते हे दोन्ही घटक अडचणीत सापडले आहेत.
ऐन श्रावणातही नाशिकचा  फुलबाजार कोमेजलेलाच
ऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार कोमेजलेलाच

नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यात श्रावण महिन्यात पूजा, सजावट यासाठी दरवर्षी मागणी असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक धार्मिक विधी आणि मंदिरे बंद असल्याने यंदा फुलबाजार श्रावणातही कोमेजलेला असल्याचे चित्र आहे. परिणामी फुल उत्पादक व विक्रेते हे दोन्ही घटक अडचणीत सापडले आहेत.  श्रावण महिन्यात फुलांची मागणी असते. त्यानुसार शहराच्या लगतच्या गावातील शेतकरी झेंडू, गुलाब, शेवंती, मखमल, ऍस्टर, गुलछडी अशी फुलांच्या लागवडी केल्या.  लॉकडाऊन शिथिल असल्याने काही फुलविक्रेते फुले घेतात, मात्र शहरातील पंचवटी परिसरात भाविकांची ओसरलेली गर्दी तसेच ग्राहकांनी पाठ फिरवल्याने श्रावणात फुलत असलेला गणेशवाडीचा बाजार सुनासुना आहे. धार्मिकस्थळे कुलूपबंद झाल्याने फुलबाजारावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी आहे, त्या दरात विक्री करावी लागत आहे. शेतकऱ्यांकडून माल जोखीम पत्करून घेतो, मात्र अंगावर पडत असल्याचे फुलविक्रेते सांगतात. 

फुलांचे दर रुपये प्रतिकिलो/नग)

  • झेंडू    120
  • शेवंती    160
  • ऍस्टर    140
  • खुला गुलाब (20नग)    12
  • पॉली हाऊस गुलाब (20 नग)    30
  • प्रतिक्रिया... श्रावणात लोक येतील या आशेने माल भरतो. मात्र जो माल घेतला, त्याची विक्रीच होत नाही, मात्र ग्राहक कमी दराने फुले मागतात. मागणीच नसल्याने विक्रीत मोठी घट झाली आहे. - मीराबाई दिवे, फुलविक्रेती 

    सर्व प्रकारच्या गुलाबपुष्पांची विक्री करतो.मात्र श्रावण असूनही फुलांना मागणी नाही. त्यातच स्थलांतरामुळे फटका बसल्याने फुलांसाठी ग्राहक येत नाहीत. मंदिरे बंद असल्याने उठाव नाही. - गणेश जगताप, फुलविक्रेता

    मागणी व दर नसल्याने दांडी शिवाय गुलाब खुडून तुकडा करून आणला जात आहे. सध्या मुंबई बाजार बंद आल्याने गुणवत्तापूर्ण माल उत्पादन खर्चाच्या खाली विकावा लागत आहे. - सोपान खोडे, गुलाब उत्पादक, महिरावणी, ता.नाशिक 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com