agriculture news in marathi Flower rates lower in holy city Nashik due to Corona Lockdown | Agrowon

ऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार कोमेजलेलाच

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक धार्मिक विधी आणि मंदिरे बंद असल्याने यंदा फुलबाजार श्रावणातही कोमेजलेला असल्याचे चित्र आहे. परिणामी फुल उत्पादक व विक्रेते हे दोन्ही घटक अडचणीत सापडले आहेत. 

नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यात श्रावण महिन्यात पूजा, सजावट यासाठी दरवर्षी मागणी असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक धार्मिक विधी आणि मंदिरे बंद असल्याने यंदा फुलबाजार श्रावणातही कोमेजलेला असल्याचे चित्र आहे. परिणामी फुल उत्पादक व विक्रेते हे दोन्ही घटक अडचणीत सापडले आहेत. 

श्रावण महिन्यात फुलांची मागणी असते. त्यानुसार शहराच्या लगतच्या गावातील शेतकरी झेंडू, गुलाब, शेवंती, मखमल, ऍस्टर, गुलछडी अशी फुलांच्या लागवडी केल्या.  लॉकडाऊन शिथिल असल्याने काही फुलविक्रेते फुले घेतात, मात्र शहरातील पंचवटी परिसरात भाविकांची ओसरलेली गर्दी तसेच ग्राहकांनी पाठ फिरवल्याने श्रावणात फुलत असलेला गणेशवाडीचा बाजार सुनासुना आहे.

धार्मिकस्थळे कुलूपबंद झाल्याने फुलबाजारावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी आहे, त्या दरात विक्री करावी लागत आहे. शेतकऱ्यांकडून माल जोखीम पत्करून घेतो, मात्र अंगावर पडत असल्याचे फुलविक्रेते सांगतात. 

फुलांचे दर रुपये प्रतिकिलो/नग)

  • झेंडू    120
  • शेवंती    160
  • ऍस्टर    140
  • खुला गुलाब (20नग)    12
  • पॉली हाऊस गुलाब (20 नग)    30

प्रतिक्रिया...
श्रावणात लोक येतील या आशेने माल भरतो. मात्र जो माल घेतला, त्याची विक्रीच होत नाही, मात्र ग्राहक कमी दराने फुले मागतात. मागणीच नसल्याने विक्रीत मोठी घट झाली आहे.
- मीराबाई दिवे, फुलविक्रेती 

सर्व प्रकारच्या गुलाबपुष्पांची विक्री करतो.मात्र श्रावण असूनही फुलांना मागणी नाही. त्यातच स्थलांतरामुळे फटका बसल्याने फुलांसाठी ग्राहक येत नाहीत. मंदिरे बंद असल्याने उठाव नाही.
- गणेश जगताप, फुलविक्रेता

मागणी व दर नसल्याने दांडी शिवाय गुलाब खुडून तुकडा करून आणला जात आहे. सध्या मुंबई बाजार बंद आल्याने गुणवत्तापूर्ण माल उत्पादन खर्चाच्या खाली विकावा लागत आहे.
- सोपान खोडे, गुलाब उत्पादक, महिरावणी, ता.नाशिक 


इतर बाजारभाव बातम्या
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये मूग, उडदाची आवक नगण्यऔरंगाबाद: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग व...
नगरमध्ये टोमॅटो, शेवग्याचे दर स्थिरनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात कांदा १२० ते ४०० रुपये दहा...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत...
सोलापुरात कांदा, कोथिंबीर, मेथीला उठाव...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये हिरवी मिरची २००० ते ५०००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३७५० ते ६८७५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
जळगावात मेथी २००० ते ३५०० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...