Agriculture news in marathi, Flower Rs. 2500 to Rs. 3500 per quintal; in Parbhani | Agrowon

परभणीत फ्लॉवर २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १६) फ्लॅावरची ३० क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १६) फ्लॅावरची ३० क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. गवारीची ७ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. चवळीची ३ क्विंटल आवक, तर दर ३००० ते ४००० रुपये मिळाला. वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची २० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १८००० ते २५०० रुपये दर मिळाले. कारल्याची २५ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले.

काकडीची ५० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ४०० ते १००० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये मेथीच्या १० हजार जुड्यांची आवक, तर दर प्रतिशेकडा ३०० ते ७०० रुपये, पालकाची १२ क्विंटल आवक, तर दर १००० ते १५०० रुपये, शेफूची १५ क्विंटल आवक, तर दर १२०० ते २००० रुपये दर मिळाले. चुक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ९० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते २५०० रुपये दर मिळाले. वांग्याची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ९०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेट २०० ते ४०० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले.

भेंडीची २० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. कोबीची ३५ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये राहिले. मधुमक्याची १५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. 

कंदवर्गीय भाज्यामध्ये बीट रुटची २ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. मुळ्याची ८ हजार नग आवक झाली. त्यांना प्रतिशेकडा ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्यांची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. लिंबांची १५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.


इतर ताज्या घडामोडी
दापोली कृषी विद्यापीठातर्फे बांधावर...रत्नागिरी ः दापोली कृषी विद्यापीठाच्या विस्तार...
अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या...अकोला ः जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३७ हजार क्विंटल...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात ३६ हजार...
मालेगाव बाजार समितीची मुख्यमंत्री...वाशीम ः कोरोनाविरुद्ध उपाययोजना करण्यास मदत...
भंडारा जिल्ह्यात ५० हजारांवर मजुरांना...भंडारा ः लॉकडाऊन काळात आर्थिक आधार म्हणून...
अकोल्यात अकरा कोटींच्या निविष्ठा...अकोला ः आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावर...
खानदेशातील टंचाईग्रस्त भागात बऱ्यापैकी...जळगाव : खानदेशात टंचाईच्या झळा बसणाऱ्या धुळ्यातील...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...जळगाव ः खरीप हंगाम तोंडावर आल्याने...
खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत...
परभणीत सोयाबीन बियाण्यांचे नापासाच्या...परभणी  ः सोयाबीनमध्ये बियाणे नापासाचे प्रमाण...
अटीशर्तीविना मका खरेदी करा खासदार डॉ....नाशिक : केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी...
शेतकऱ्यांनो कृषी निविष्ठांची पावती...नांदेड : शेतकऱ्यांनी येत्या खरीप हंगामासाठी खते,...
जालन्यात १२ हजारावर शेतकऱ्यांनी तपासली...जालना : कृषी विभागातर्फे जिल्ह्यात एकाच दिवशी...
नगर जिल्ह्यात ९३ टॅंकरव्दारे पाणीपुरवठानगर  ः नगर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता...
नगर, पारनेर, नेवासेत कांदा लिलाव बंदचनगर  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन...
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून...हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या...
नांदेड जिल्ह्यात ७० हजार क्विंटलवर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतंर्गंत...
अंबडमध्ये कापूस खरेदीसाठी दोन...अंबड, जि. जालना : येथील मे सुरज ॲग्रोटेकच्या...
सांगलीत साखरेचे उत्पादन १८ लाख...सांगली ः जिल्ह्यातील यंदा गाळप हंगाम नुकताच पंधरा...
कृषिमंत्री अकोल्यात उद्या घेणार खरीप...अकोला ः राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे बुधवारी (ता...