परभणीत फ्लॉवर ६०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल

Flower Rs. 600 to 1000 per quintal in Parbhani
Flower Rs. 600 to 1000 per quintal in Parbhani

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.२४) फ्लॅावरची ६० क्विंटल आवक झाली. फ्लॅावरला प्रतिक्विंटलला ६०० ते १००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यामध्ये वाटण्याची ८० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. गवारीची १० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. चवळीची ४ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला २००० ते ४००० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये मेथीच्या १५ हजार जुड्यांची आवक झाली. तिला प्रतिशेकड्याला ४०० ते ७०० रुपये दर मिळाले. पालकाची १५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ७०० ते १००० रुपये दर मिळाले. शेपूची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १००० रुपये दर मिळाले. चुक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची १५० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटलला ५०० ते १२०० रुपये मिळाले.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ८ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. कारल्याची ७ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २५ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये मिळाले. काकडीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची २० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले. वांग्यांची ५० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला १००० ते २००० रुपये दर मिळाले.

टोमॅटोची १००० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला १०० ते २०० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ७ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. कोबीची ७० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला ४०० ते ८०० रुपये मिळाले. 

भेंडीला २५०० ते ४००० रुपये 

भेंडीची १५ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये मिळाले. बीटरुटची ५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विटंलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले. गाजराची ५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १५०० रुपये दर मिळाले. लिंबांची २० क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये मिळाले. पेरूची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १५०० रुपये दर मिळाले. चण्याची २५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १२०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com