Agriculture news in Marathi Flower sales business stop; Time to throw | Agrowon

फूल विक्रीचा व्यवसाय डबघाईस; फेकून देण्याची वेळ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 एप्रिल 2020

शिरपूरजैन, जि. वाशीम : येथील फूल उत्पादक शेतकरी भगवान घिरके यांनी आपल्या शेतातील फुलांची झाडे उपटून टाकली. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीमुळे, लॉकडाऊन दरम्यान फुले विक्री बंद झाली. झाडावरच फुले सडू लागली आहेत. त्यामुळे जिवापाड जपलेली एक एकरातील फुलांची झाडे उपटून टाकण्याची वेळ घिरके यांच्यावर आली.

शिरपूरजैन, जि. वाशीम : येथील फूल उत्पादक शेतकरी भगवान घिरके यांनी आपल्या शेतातील फुलांची झाडे उपटून टाकली. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीमुळे, लॉकडाऊन दरम्यान फुले विक्री बंद झाली. झाडावरच फुले सडू लागली आहेत. त्यामुळे जिवापाड जपलेली एक एकरातील फुलांची झाडे उपटून टाकण्याची वेळ घिरके यांच्यावर आली.

येथील शेतकरी भगवान घिरके यांनी आपल्या चार एकर शेतापैकी दोन एकरात सोयाबीन, हळद, गहू अशी पिके घेतली तर दोन एकरात फूल शेती केली होती. त्यात दैनंदिन वापरण्यात येणारे शेवंती, गिलाटी, लिली, मोगरा, गुलाब, बिजली, निशिगंधा यासह देखाव्याची झाडे देखील लावली होती. त्यांनी काही झाडांच्या रोपांची लागवड जून तर काहींची नोव्हेंबर महिन्यात केली होती. 

लागवडीपासून जवळपास रोपे विकत घेण्यासाठी ८ हजार रुपये खर्च लागला. त्यानंतर ४ ते ५ हजार रुपये रासायनिक खते, ५ ते ६ हजार कीडनाशक फवारणीवर खर्च केले. इतर मजुरीही पाच हजारांवर लागलेली आहे. जवळपास २५ ते ३० हजार रुपये खर्च झाला. यातून आत्तापर्यंत आलेल्या फुलांच्या माध्यमातून साधारणतः ३ ते ४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. या शेतीतून किमान १ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, ‘कोरोना’ने घात केला. लॉकडाऊनमुळे फुले काढणे व विकणे बंद झाले. स्वतःचा फुलहार विक्रीचा व्यवसाय बंद झाला. फुलांची मागणी पूर्ण बंद झाली. आता फुल विक्री बंद झाल्याने दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले आहे. भविष्यातील उत्पन्नाला ब्रेक लागला आहे.


इतर ताज्या घडामोडी
संतुलित खत व्यवस्थापनावर द्या भरमाती परीक्षणानुसार जमिनीमध्ये उपलब्ध...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
सुधारित तंत्राने शेवगा लागवडशेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील...
वेलीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे...द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण...
कोरडवाहू शेतीसाठी आंतरपीक पद्धती...महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू शेतीचे जवळपास ८५...
फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीकफळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला...
मांडा ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रकआपल्या गावाचा ग्रामविकास आराखडा आपण सर्वांनी...
नाशिकमध्ये दोडका ३३३५ ते ४५८५ रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
राज्यात टोमॅटो ५०० ते २५०० रूपये...सांगलीत १ हजार ते १२५० रूपये दर सांगली  ः...
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...