गुलटेकडीत फ्लॉवर, वांगी, गाजराच्या दरात वाढ

गुलटेकडीत फ्लॉवर, वांगी, गाजराच्या दरात वाढ
गुलटेकडीत फ्लॉवर, वांगी, गाजराच्या दरात वाढ

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १०) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. पावसाच्या उघडिपीमुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत विविध भाजीपाल्याची आवक वाढली होती; तर नवीन कांदा भिजलेला असल्याने त्याचा दर्जा खालवलेला आहे. यामुळे जुन्या कांद्याच्या दरात वाढ झाली होती. काकडी, फ्लॉवर, सिमला मिरची, वांगी, शेवगा, गाजर यांच्या दरात वाढ झाली होती. 

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून ४ ट्रक कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे १ टेम्पो, कर्नाटकातून श्रावणी घेवडा ४ टेम्पो, हिमाचल मधून १ ट्रक आणि पंजाबमधून ३ ट्रक मटारची आवक झाली होती; तर मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी; तर आग्रा आणि इंदौर येथून बटाटा सुमारे ८० ट्रक आवक झाली होती. 

महाराष्ट्राच्या विविध भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ७०० गोणी, टॉमेटो सुमारे ५ हजार क्रेट, कोबी, फ्लॉवर आणि सिमला मिरची प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, गाजर २ टेम्पो, गवार सुमारे ६ टेम्पो, भेंडी १२ टेम्पो, काकडी ८ टेम्पो, हिरवी मिरची ४ टेम्पो, गाजर २ टेम्पो, तांबडा भोपळा सुमारे १० टेम्पो, भुईमूग सुमारे ८० गोणी, तसेच कांदा नवीन सुमारे ३० ट्रक तर जुना ४५ ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : जुना- ५००-६२०, नवीन १००-३००, बटाटा : १००-२००, लसूण : १०००-१६००, आले : सातारी ४००-६००, भेंडी : २००-३००, गवार : ४००-६००, टोमॅटो : २००-२५०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : १५०-२५०, दुधी भोपळा : १५०-२५०, चवळी : २५०-३००, काकडी : १६०-२००, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी २००- २२०, पापडी : ३००-३५०, पडवळ : १५०-२००, फ्लॉवर : १८०-२००, कोबी : १२०-१६०, वांगी : ४००-५००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी ४००-५००, जाड : २००-२५०, शेवगा : ८००-१०००, गाजर : ४००-५००, वालवर : ३००-३५०, बीट : १२०-१४०, घेवडा : २५०-३००, कोहळा : १००-१५०, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-३००, पावटा : ५००-६००, भुईमूग शेंग : ४५०- ५००, मटार : ७००-९००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २४०-,२५० मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्यांमध्ये स्थानिक कोथिंबिरीची आवक मंदावल्याने परराज्यांतून आवक सुरू झाली. यामध्ये जयपूर, हरियाना येथून सुमारे १ लाख जुड्या आवक झाली होती. स्थानिक आवक अवघी सुमारे ५० हजार आवक होती. स्थानिक आवकेतदेखील नाशिक जिल्ह्यांतून मोठी आवक होती. तरीही दर तेजीतच होते.  पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १५०० -४०००, मेथी : १२००-१८००, शेपू : ८००-१५००, कांदापात : १५०० -२५००, चाकवत : १००० -१२००, करडई : ८०० -१०००, पुदिना : ४०० -५००, अंबाडी : १०००-१२००, मुळे : १०००-१८००, राजगिरा : ८०० -१०००, चुका : ८००-१०००, चवळई : १२०० -१५००, पालक : १००० -१५००.

तोतापुरी कैरीचा हंगाम सुरू  मद्रास येथून तोतापुरी कैरीची आवक सुरू झाली असून, सुमारे १ टन आवक होत आहे. किलोला ६० ते ७० रुपये दर मिळत आहे.

फळबाजार  रविवारी (ता. १०) येथील फळ विभागात मोसंबी सुमारे ६० टन, संत्री ५० टन, डाळिंब ३०० टन, कलिंगड ५ टेम्पो, खरबूज १५ टेम्पो, पपई २० टेम्पो, लिंबे सुमारे दोन हजार गोणी, चिकू एक हजार डाग, सीताफळ २० टन; तर विविध बोरांची सुमारे चारशे गोणी आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : १५०-२००, मोसंबी : (३ डझन) : २५०-५००, (४ डझन ) : १५०-२५०, संत्रा : (३ डझन) : १२०-३००, (४ डझन ) : ५०-१५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१२०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-४०. कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-२०, पपई : ५-२०, चिकू : १००-७००, पेरू (२० किलो) : ४५०-८००, सीताफळ : ५०-१२०, सफरचंद : सिमला (२५ ते ३० किलो) २०००-२५००, किन्नोर : (२५-३० किलो) २५००-३०००, काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) ८००-१४००. बोरे - (१० किलोंचे दर) चमेली - २५०-३००, उमराण - १२०-१५०, चेकनट ६००-६५०, चण्यामण्या ४००-६००. 

फूलबाजार तुळशीची लग्न सुरू झाल्याने फुलांना मागणी वाढली असून, १० टक्क्यांनी दरदेखील वाढले आहेत.  फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : ४०-७०, कापरी : २०-४०, शेवंती : १०-६०, अ‍ॅस्टर : ८-१२, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-३०, गुलछडी काडी : १०-४०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, लिलि बंडल : ५-१०, जर्बेरा : ४०-५०, कार्नेशियन : ६०-१२०.

मासळी बाजार गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. १०) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १२ टन, खाडीची ४०० किलो; तर नदीच्या मासळीची सुमारे दीड टन आवक झाली होती. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १४ टन आवक झाल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी  (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १६००-१८००,  मोठे १५००- १६००, मध्यम : ८००-८५०, लहान ६००-८०. ६५०, भिला :४००-४८०, हलवा : ४८०-५००, सुरमई : ५५०, रावस : लहान ५५०, मोठा  ७५०, घोळ : ५५०, भिंग : ३२०, करली : २८०-३२०, करंदी : ३६०, पाला :  लहान  ८००,  मोठे - १०००-११००, वाम : लहान  पिवळी ६५०, मोठे ८००-९००,  काळी : ४००-४८०, ओले बोंबील : १४०-२००. 

कोळंबी  लहान  २८० मोठे  ४८०-५५०, जंबोप्रॉन्स : १५००, किंगप्रॉन्स : ८५०-९००, लॉबस्टर : १३००, मोरी : लहान २००, मोठे  ४००, मांदेली : १२०-१६०, राणीमासा : २००, खेकडे : २००-२४०, चिंबोऱ्या : ५५०. 

खाडीची मासळी   सौंदाळे : २४०, खापी : १६०-२००, नगली : लहान  २८० मोठी ७५०, तांबोशी : ४८०, पालू : २४०, लेपा : १४० -१६०, मोठे  २४०-२८०, शेवटे : २४०, बांगडा : लहान  १६० ,मोठे  २४०-३२०, पेडवी : ८०, बेळुंजी : १६०, तिसऱ्या : १६०-२००, खुबे : १४०, तारली : १८०. 

नदीची मासळी  रहू : १६०, कतला : १६०, मरळ : ३६०, शिवडा : २४०, चिलापी : ८०, खवली : २००, आम्ळी : १२०, खेकडे : २०० वाम : ५२०.

मटण  बोकडाचे : ५२०, बोल्हाईचे : ५२०, खिमा : ५२०, कलेजी : ५८०.

चिकन  चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. 

अंडी  गावरान : शेकडा : ७४० डझन : ९६ प्रतिनग : ८. इंग्लिश : शेकडा : ४४५ डझन : ६५ प्रतिनग : ५.५  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com