Agriculture news in marathi, Flowers in Aurangabad to Rs. 1400 to 2500 per quintal | Agrowon

औरंगाबादेत फ्लॉवर १४०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९) फ्लॉवरची ६१ क्‍विंटल आवक झाली. त्याला १४०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९) फ्लॉवरची ६१ क्‍विंटल आवक झाली. त्याला १४०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची १०१ क्‍विंटल आवक झाली. तिला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कांद्याची आवक १५९० क्‍विंटल, तर दर ४०० ते २२०० रूपये प्रतिक्‍विंटल राहिला. १७५ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोला ४०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २७ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर ७०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीला ४००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३४ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीचे दर १८०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. वालशेंगांची ३ क्‍विंटल आवक झाली. त्यांना ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. चवळीची आवक २ क्‍विंटल. तर दर २००० ते २७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. 

काकडीची २७ क्‍विंटल आवक झाली. तिला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ७ क्‍विंटल आवक झालेल्या कारल्याचे दर १००० ते १८०० रुपये राहिले. १४ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याचे दर १५०० ते २००० रुपये दर राहिले. १३० क्‍विंटल आवक झालेल्या कोबीला ४०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३० क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला १५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. काशीफळाची आवक २३ क्‍विंटल, तर दर ५०० ते १००० रुपये मिळाला. १४ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला २००० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३१ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबांना १००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

अंजिराची ३ क्‍विंटल आवक झाली. त्यांना ३००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५४ क्‍विंटल आवक झालेल्या सीताफळाला १८०० ते ४२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ७ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला १००० ते १३०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. ६ हजार ५०० जुड्यांची आवक झालेल्या पालकाला ८०० ते १००० रूपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. कोथिंबिरीची ९८०० जुड्यांची आवक झाली. तिला १००० ते २००० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...