फ्लॉवर, गाजर, भेंडी, कोबी, वांग्याच्या आवकेत चढउतार

फ्लॉवर, गाजर, भेंडी, कोबी, वांग्याच्या आवकेत चढउतार
फ्लॉवर, गाजर, भेंडी, कोबी, वांग्याच्या आवकेत चढउतार

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फ्लॉवर, गाजर, भेंडी, कोबी, वांगी व हिरव्या मिरचीच्या आवकेत चढउतार पाहायला मिळाली. बाजार समितीमध्ये येत असलेल्या मालाचे दर जरी कमी दिसत असले तरी किरकोळ बाजारात ग्राहकांना लागणारे दर मात्र बऱ्यापैकी जास्त असल्याची स्थिती पाहायला मिळाली. हिरव्या मिरचीचे दर जवळपास स्थिर होते.  औरंगाबाद बाजार समितीमध्ये १ ते ८ फेब्रुवारीदरम्यान फ्लॉवरची आवक चांगलीच कमी अधिक राहिली. किमान ५६ ते कमाल १४२ क्‍विंटलपर्यंत आवक झालेल्या फ्लॉवरचे दर २०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत राहिले. अर्थात १ फेब्रुवारीला कमाल ८०० रुपये प्रतिक्‍विंटलपर्यंत असलेले फ्लॉवरचे दर आठवडा सरेपर्यंत कमाल ३०० रुपये प्रतिक्‍विंटलपर्यंत खाली आले होते. गाजराची आवकही १७ ते १३५ क्‍विंटलदरम्यान कमी अधिक होत राहिली. या गाजरांना ६०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलपर्यंतचे दर मिळाले. गाजराच्या किमान दरातही चढउतार पाहायला मिळाला. ९ ते ३४ क्‍विंटल दरम्यान आवकेत चढउतार राहिलेल्या भेंडीला १३०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलदरम्यान दर मिळाला. भेंडीचे किमान दरही १३०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान राहिले. पत्ताकोबीची आवक ५५ ते १६३ क्‍विंटलदरम्यान  राहिली. या कोबीला २०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलदरम्यान दर मिळाला. वांग्याची आवक २८ ते ५८ क्‍विंटलदरम्यान तर दर ४०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटलदरम्यान राहिले. ५५ ते १३९ क्‍विंटलदरम्यान आवक झालेल्या हिरव्या मिरचीला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलदरम्यान दर मिळाले. आवकेत चढउतार असला तरी हिरव्या मिरचीच्या दरात मात्र जवळपास स्थिरता पाहायला मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com