agriculture news in marathi flowers decoration in Vitthal_Rukhmini Temple | Agrowon

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात ४० हजार सोनचाफ्याच्या फुलांची सजावट

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 मार्च 2020

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेसह मंदिराच्या गाभाऱ्याला बुधवारी (ता.२५) ४० हजार सोनचाफ्याच्या फुलांची सजावट करत पुजा केली. या सजावटीमुळे विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या मूर्ती लोभस आणि सुंदर दिसत होत्या.

सोलापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद आहे. सध्या फक्त मंदिरातील नित्योपचार आणि पुजा सुरू आहेत. त्यात बुधवारी नववर्ष आणि गुढीपाडवा असल्याने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची पुजा ही दरवर्षीप्रमाणेच व्हावी, यासाठी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी स्वखर्चातून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेसह मंदिराच्या गाभाऱ्याला बुधवारी (ता.२५) ४० हजार सोनचाफ्याच्या फुलांची सजावट करत पुजा केली. या सजावटीमुळे विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या मूर्ती लोभस आणि सुंदर दिसत होत्या.

वर्षभरातील विविध सणावारानिमित्त मंदिरात दोन्ही मूर्तींना आकर्षक फुलांची आणि फळांची सजावट करण्यात येते. तसेच त्यासाठी त्याचे दातेही ठरलेले असतात. परंतु गेल्या आठ दिवसांपासून कोरोनामुळे मंदिरातील दर्शन बंद आहे.

साहजिकच, भाविकांची कोणतीही गर्दी दर्शनासाठी नाही. पण आज भारतीय संस्कृतीतील महत्त्वाच्या अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या सणाचा दिवस. त्यामुळे अन्य दाता शोधण्याऐवजी स्वतः जोशी यांनी स्वखर्चाने मुंबईहून १५० किलो पिवळ्या सोनचाफ्याची फुले आणत, मंदिराची सजावट केली आणि पहाटे चारच्या सुमारास श्री. विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा केली. रोज एकवेळ काकडा आरती होते, पण आज पाडव्यानिमित्त दोनवेळा काकडा आरती झाली. आता उद्यापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची चंदन उटीपुजा सुरू होणार आहे. 


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...
मराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...
'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...
टोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...
सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...
टोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...
उष्णतेच्या लाटेने पिके होरपळलीपुणे : राज्यात मराठवाडा, विदर्भासह खानदेशात...
संसर्गाचे थैमान, महाराष्ट्र, तामिळनाडू...नवी दिल्ली : जगातील अन्य देशांसोबतच भारतातही...
सहकारी क्षेत्रातील दुग्ध उद्योगांसमोर...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...