नाशिकमध्ये फ्लॉवर १२२१ ते ५३१४ रूपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फ्लॉवरची आवक १४२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १२२१ ते ५३१४ दर मिळाला.
Flowers in Nashik from Rs. 1221 to Rs. 5314
Flowers in Nashik from Rs. 1221 to Rs. 5314

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फ्लॉवरची आवक १४२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १२२१ ते ५३१४ दर मिळाला. सर्वसाधारण दर ३५७१ रुपये राहिला. आवक सर्वसाधारण असल्याने दरात सुधारणा होत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

वांग्यांची आवक ३८० क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल ४००० ते ७०००, तर सरासरी दर ५००० राहिला. कोबीची आवक ५२७  क्विंटल झाली. तिला ९१७ ते २५००, तर सरासरी दर १७०८ राहिला. ढोबळी मिरचीची आवक ३४४ क्विंटल झाली. तिला ५००० ते ९३७५, तर सर्वसाधारण दर ६२५० मिळाला. भोपळ्याची आवक ९७५ क्विंटल होती. त्यास २००० ते ३६६६, तर सरासरी २६६६ रूपये दर राहिला.

कारल्याची आवक ४७४ क्विंटल झाली. त्यास ३३३३ ते ४१६६ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३७५० राहिला. दोडक्याची आवक २१६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४१६६  ते ६६६६ दर मिळाला. सर्वसाधारण दर ५०००रुपये राहिला. गिलक्याची आवक १८० क्विंटल झाली. त्यास २५०० ते ५००० दर मिळाला. सर्वसाधारण दर  ३७५० राहिला. 

भेंडीची आवक ३० क्विंटल झाली. तिला १६६६ ते ४१६६ असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ३१२५ राहिला. हिरव्या मिरचीची आवक ३६ क्विंटल झाली. तिला ४००० ते ५५०० असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ३५०० राहिला. काकडीची आवक १४० क्विंटल झाली. तिला २५०० ते ३५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० राहिला. 

कांद्याची आवक १५८५ क्विंटल झाली. त्यास ६५१ ते ३७०० असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ३१५० राहिला. बटाट्याची आवक ६२९  क्विंटल झाली. त्यास १९०० ते २९०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २३५० राहिला. लसणाची आवक १६ क्विंटल झाली. आवक कमी होऊन दर वधारले आहेत. त्यास ५५०० ते ११००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ८६०० राहिला. 

डाळिंबांना सरासरी ७००० रूपये

फळांमध्ये डाळिंबाची आवक ७०१ क्विंटल झाली. त्यास ३०० ते १०५०० दर होता. सर्वसाधारण दर ७००० राहिला. केळीची आवक ६० क्विंटल झाली. तिला ४०० ते १००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० राहिला. मोसंबीची आवक १७० क्विंटल झाली. तिला १८०० ते ३५०० दर होता. सर्वसाधारण दर २८०० राहिला. पपईची आवक १० क्विंटल झाली. तिला ९०० ते १९०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १४०० राहिला. शहाळ्याची आवक १३४ क्विंटल झाली. त्यास २५०० ते ३४०० दर होता. सर्वसाधारण दर ३००० राहिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com