agriculture news in marathi, fluctuation in temperature after rain stop, Maharashtra | Agrowon

पावसाच्या उघडिपीनंतर तापमानात ‘चढ-उतार’

टीम अॅग्रोवन
रविवार, 9 सप्टेंबर 2018

पुणे: राज्यात पावसाने उघडीप दिल्याने तापमानात चढ-उतार होत आहेत. दोन दिवसांपूर्वी तिशीपार गेलेले तापमान पुन्हा खाली घसरले आहे. दिवसाबरोबरच रात्रीच्या तापमानातही घट झाल्याने अनेक ठिकाणी गारठा जाणवू लागला आहे. पुढील आठवडाभर राज्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

पुणे: राज्यात पावसाने उघडीप दिल्याने तापमानात चढ-उतार होत आहेत. दोन दिवसांपूर्वी तिशीपार गेलेले तापमान पुन्हा खाली घसरले आहे. दिवसाबरोबरच रात्रीच्या तापमानातही घट झाल्याने अनेक ठिकाणी गारठा जाणवू लागला आहे. पुढील आठवडाभर राज्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

शनिवारी (ता. ८) राज्याच्या बहुतांशी भागात तापमानाचा पारा सरासरीच्या खाली उतरला आहे. विदर्भात असलेल्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे दिवसाच्या तापमानात ४ ते ७ अंशांची मोठी घट झाली आहे. तर विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही दिवस रात्रीचे तापमान कमी झाले अाहे. सकाळपर्यंत २४ तासांमध्ये बीड येथे दिवसाचे उच्चांकी ३१.८ अंश सेल्सिअस, उस्मानाबाद येथे रात्रीचे नीचांकी १३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
 
मध्य प्रदेशाच्या वायव्य भागात असलेल्या ठळक कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होत आहे. यातच माॅन्सूनचे प्रवाह कमजोर झाल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. शनिवारी सकाळपर्यंत विदर्भात अनेक ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. उर्वरित राज्यात कोरडे व अंशत: ढगाळ हवामान होते. आठवडाभर हिच स्थिती कायम असून, पावसाची उघडीप कायम राहणार आहे. तर तापमानातही चढ-उतार होण्याची शक्यता अाहे.  

 शनिवार (ता. ८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कसांत किमान तापमान(अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २६.५ (२०.०), जळगाव ३१.० (२१.८), कोल्हापूर २६.३(२०.६), महाबळेश्‍वर १८.८(१५.६), मालेगाव ३०.६(२०.४), नाशिक २८.३(१९.९), सांगली २८.७(१९.४), सातारा २७.६(२०.२), सोलापूर २९.९ (२०.०), सांताक्रुझ ३०.९(२४.२), अलिबाग ३०.२(२४.८), रत्नागिरी २९.३(२३.१), डहाणू ३१.६(२४.५), आैरंगाबाद ३०.०(१८.६), परभणी ३०.१(१९.६), नांदेड ३१.०(१७.२), उस्मानाबाद २८.० (१३.८), अकोला २८.४(२२.५), अमरावती २३.६(२०.८), बुलडाणा २६.५ (२०.२), चंद्रपूर २६.२ (२२.०), गोंदिया २६.२(२३.४), नागपूर २५.८(२२.३), वर्धा २४.२(२०.८), यवतमाळ २५.०(२०.०). 
 


इतर अॅग्रो विशेष
सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर...अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना...
कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमानातील वाढीबरोबरच किमान...
थेट सरपंच निवड रद्दमुंबई: थेट सरपंच निवड रद्द करणारे विधेयक मंगळवारी...
निर्यात न करणाऱ्या कारखान्यांच्या साखर...कोल्हापूर : देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ६८...मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री...
राज्यात उन्हाचा चटका कायम पुणे : राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत....
‘पीएम-किसान’ योजनेत शेतकऱ्यांना ५१ हजार...नवी दिल्ली: केंद्र सरकारने गेल्या वर्षी पंतप्रधान...
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांचा गदारोळ मुंबई: शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने एकही आश्वासन...
खारपाणपट्ट्यात पिकले गोड अॅपेल बोरअंधेरा कितना भी घना क्यू ना हो, दिया जलाना कहाँ...
कृषी शिक्षणाचा खर्चही आता लाखाबाहेर पुणे : राज्यातील खासगी कृषी शिक्षण संस्थांच्या...
निवृत्त जवानाचा अनुकरणीय शेळी-...सुर्डी (जि. सोलापूर) येथी हिरोजीराव शेळके यांना...
कर्जमाफीची पहिली यादी आज होणार जाहीर :...मुंबई : आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर...
राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र...मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत...
कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची...मुंबई : आजपासून (ता. २४) सुरू होणारे अर्थसंकल्पी...
अकरा लाख टन रिफाइंड पामतेल आयातीला...नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड पामतेलाची...
कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू...नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी...
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाजपुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व...
‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढपुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन...