agriculture news in marathi, fluctuation in weather | Agrowon

सकाळी गारठा, दुपारी चटका; तापमानातील तफावत वाढली

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मार्च 2019

पुणे : उत्तेरकडून वाहणारे जोरदार वारे आणि दुपारी वाढलेले ऊन यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात तापमानात वेगाने बदल झाले आहेत. सकाळच्या वेळी गारठा तर दुपारी वाढलेला उन्हाचा चटका असे परस्पर विरोधी तापमान अनुभवायला येत आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर, सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.१, तर महाबळेश्‍वर येथे नीचांकी १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ६) राज्यात मुख्यत: निरभ्र आकाशासह कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पुणे : उत्तेरकडून वाहणारे जोरदार वारे आणि दुपारी वाढलेले ऊन यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात तापमानात वेगाने बदल झाले आहेत. सकाळच्या वेळी गारठा तर दुपारी वाढलेला उन्हाचा चटका असे परस्पर विरोधी तापमान अनुभवायला येत आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर, सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.१, तर महाबळेश्‍वर येथे नीचांकी १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ६) राज्यात मुख्यत: निरभ्र आकाशासह कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

परस्पर विरोधी हवामानामुळे राज्याच्या कमाल-किमान तापमानातील तफावतही वाढली अाहे. राज्यात विविध ठिकाणी दोन्ही तापमानात ९ ते २३ अंशांपर्यंत फरक दिसून येत आहे. नगर येथे दिवसा ३७.१ अंश, तर रात्री १३.८ अंशांची नोंद होत तब्बल २३ अशांपेक्षा अधिक घट झाली आहे. नगर, सोलापूर पाठोपाठ सांगली, बीड, परभणी, अमरावती, चंद्रपूर, नागपूर येथे पारा ३६ अंशांच्या पुढे गेला आहे. तर अनेक ठिकाणी तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले अाहे. बहुतांशी ठिकाणी रात्रीचे तापमान १५ अंशांच्या पुढे असून, पहाटे थंडगार वारेही वाहत आहे. 

मंगळवारी (ता. ५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.१ (१७.५), नगर ३७.१ (१३.८), जळगाव ३३ (१६.४), कोल्हापूर ३३.८ (१८.४), महाबळेश्वर २९ (१३), मालेगाव ३४.४ (१६.२), नाशिक २९.४ (१५), सांगली ३६.४ (१५.४), सातारा ३४.८ (१५.३), सोलापूर ३७.१ (१९.७), अलिबाग ३२.८ (२१.४), डहाणू २९.३ (२०), सांताक्रूझ २९.९ (२०.६), रत्नागिरी ३०.५ (२०.७), औरंगाबाद ३३.५ (१७.६), बीड ३६.२ (१७.९), नांदेड -१८ , उस्मानाबाद - (१७.१), परभणी ३६.६ (१९.४), अकोला ३२.९ (१९.५), अमरावती ३६.२ (१७.८), बुलडाणा ३१.२ (१७.६), चंद्रपूर ३६.४ (२०.४), गडचिरोली ३५.४ (२१.०), गोंदिया ३१.२ (१३.७), नागपूर ३६.२ (२१.१), वर्धा ३५ (२०.४), वाशीम ३५.४ (१८), यवतमाळ ३५.० (१९.४).


इतर अॅग्रो विशेष
व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा नकोचशेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याबाबतची एक चळवळ...
क्रयशक्ती वाढविणारा हवा अर्थसंकल्पकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी...
कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं...कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास...
विदर्भ, कोकणात आज हलक्या पावसाचा अंदाज पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांअभावी राज्यात थंडी...
नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत ५७...नाशिक : राज्यातून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत...
दूध उत्पादक महत्त्वाचा दुवा: हरिभाऊ...औरंगाबाद : जिल्हा दूध संघाच्या एकूणच...
अर्जेंटिनाला होणार आंबा निर्यात पुणे : कोकणातील हापूस आणि मराठवाड्यातील केशर...
गावरान अळूची फायदेशीर व्यावसायिक शेतीसुमारे पंधरा गुंठ्यांत देशी गावरान अळूची शेती...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
‘पोकरा’ प्रकल्पात कृषी यांत्रिकीकरणाचे...अकोला  ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...