agriculture news in marathi, fluctuation in weather continues | Agrowon

तापमानातील चढ-उतार सुरूच

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 मार्च 2019

पुणे : उत्तेरकडून महाराष्ट्राकडे येत असलेल्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे रात्रीच्या तापमानात घट झाली आहे. तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये किमान तापमानासह कमाल तापमानातही घट झाल्याचे दिसून आले अाहे. राज्यात मुख्यत: निरभ्र व कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.   

पुणे : उत्तेरकडून महाराष्ट्राकडे येत असलेल्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे रात्रीच्या तापमानात घट झाली आहे. तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये किमान तापमानासह कमाल तापमानातही घट झाल्याचे दिसून आले अाहे. राज्यात मुख्यत: निरभ्र व कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.   

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर, नांदेड येथे राज्यातील उंच्चांकी ३७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, तर यवतमाळ वगळता उर्वरित सर्वच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या खाली उतरला आहे. निफाड (जि. नाशिक) येथे राज्यातील नीचांकी ९.२ अशं सल्सिअस तापमानाची, तर महाबळेश्‍वर ११.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक, सांगली, गोंदिया येथे तापमान १४ अंश किंवा त्यापेक्षा खाली आले अाहे. 

परस्पर विरोधी हवामानामुळे राज्याच्या कमाल-किमान तापमानातील तफावत वाढली अाहे. राज्यात विविध ठिकाणी दोन्ही तापमानांत १० ते २२ अंशांपर्यंत फरक दिसून येत आहे. तसेच कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत १ ते ४ अंशांनी कमी झाले अाहे. पहाटे वाहत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे गारठा तर दुपारी उन्हाचा चटका अशीच स्थिती आहे. 

बुधवारी (ता. ६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.८ (१५.५), नगर ३७.० (१६.०), जळगाव ३१.६ (१५.०), कोल्हापूर ३२.२ (१७.४), महाबळेश्वर २७.२ (११.८), मालेगाव ३२.४ (१५.४), नाशिक २९.८ (१४.०), सांगली ३५.० (१३.९), सातारा ३३.१ (१३.३), सोलापूर ३४.६ (१९.०), डहाणू २९.४ (१८.३), रत्नागिरी ३०.० (१९.६), औरंगाबाद ३०.६ (१६.८), नांदेड ३७.०(१८.०), परभणी ३४.० (१७.०), अकोला ३२.६ (१५.५), अमरावती ३४.८ (१५.२), बुलडाणा २८.२ (१६.५), चंद्रपूर ३५.५ (१९.२), गडचिरोली ३४.० (१७.४), गोंदिया ३१.३ (१३.०), नागपूर ३४.२ (१६.५), वर्धा ३३.९ (१७.४).


इतर अॅग्रो विशेष
बदल ठरावेत लाभदायकयवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील हजारो...
हवामान बदल हेच सर्वांत मोठे आव्हानआ ज जगभरात हवामान बदल आणि त्याचे होणारे परिणाम हा...
महिनाभरात पडणार नाशिक विभागातील साखर...नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा ३२ पैकी केवळ...
महिलांनी मालक बनले पाहिजे ः राज्यपालमुंबई ः महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे...
कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी...मुंबई ः दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी...
ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न का वाढत नाही...पुणे: देशात ५० टक्के रोजगार हा शेतीशी निगडित व...
नागपूर : थंडीची तीव्रता वाढली; अंडी...नागपूर ः थंडीच्या दिवसांत मागणी वाढत अंड्यांचे...
निफाडला २.४ अंश तापमान; राज्य थंडीने...पुणे : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या...
शेतात नवे प्रयोग करणारे शेतकरी आमचे...मुंबई ः प्रत्यक्ष शेतात राबून नवनवीन प्रयोग...
चिखलदऱ्याच्या स्ट्राॅबेरीला हवाय...अमरावती ः लागवड खर्चाच्या दुप्पट उत्पन्न मिळवून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १८ लाख टन...औरंगाबाद: मराठवाड्यातील औरंगाबाद साखर सहसंचालक...
कमी खर्चातील गांडूळखतनिर्मिती तंत्राचा...अंबेजोगाई (जि. बीड) येथील शिवाजी खोगरे यांनी कमी...
आरोग्यदायी अन्ननिर्मितीबरोबरच जपली...धानोरा- भोगाव (जि. हिंगोली) येथील दादाराव राऊत आठ...
पशुधन विकासाची वसाहत वाटपशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाची...
रस्ते की मृत्यूचे सापळेआपला देश संपूर्ण विश्वात रस्ते अपघातात अव्वल आहे...
फलोत्पादन योजनांमध्ये बदलास केंद्र तयार पुणे: “फलोत्पादनातील उत्पन्नवाढीसाठी सध्याच्या...
शेतीसाठी आवश्‍यक ते सर्वकाही करणार :...माळेगाव, जि. पुणे ः कमी पाणी व कमी जागेत अधिक...
कलिंगड शेती ठरते आहे फायदेशीरअकोला ः मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन परिसरात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडी पुणे ः राज्यातील थंडीत चढउतार सुरू आहे. मध्य...
हमीभावाच्या संदर्भात वायदे बाजारावरही...लातूर : हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी...