Agriculture news in Marathi Fluctuations in state temperature | Page 3 ||| Agrowon

राज्याच्या तापमानात चढ-उतार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 ऑक्टोबर 2021

राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात चढ- उतार सुरू आहेत. स्वच्छ सूर्य प्रकाशामुळे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली असली तरी किमान तापमानात मात्र हळूहळू घट होत आहे.

पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात चढ- उतार सुरू आहेत. स्वच्छ सूर्य प्रकाशामुळे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली असली तरी किमान तापमानात मात्र हळूहळू घट होत आहे. आज (ता. २०) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बिहार आणि परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले असून, या भागात चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून अरबी समुद्रापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तरेकडील राज्यांसह पूर्व आणि ईशान्य भारतात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल आणि कमान तापमानात चढ-उतार होत आहे. बुधवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूर येथे उच्चांकी कमाल ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर किमान तापमानाचा पारा हळूहळू २० अंशांच्या खाली येऊ लागला आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

मॉन्सून लवकरच घेणार देशाचा निरोप
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचा निरोप घेतला आहे. देशाच्या उर्वरित भागातून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान झाले आहे. शनिवारपर्यंत (ता. २३) गोवा, ईशान्य आणि पूर्व भारतासह देशाच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतण्याचे संकेत आहेत. तर मंगळवारपर्यंत (ता. २६) मॉन्सून देशाचा निरोप घेणार असून, दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


इतर बातम्या
माण तालुक्यात द्राक्ष शेतीचे पावसामुळे...कुकुडवाड, जि. सातारा : मागील आठवड्यात सलग आठवडाभर...
हापूस आंब्याचा हंगाम धोक्यातरत्नागिरी ः कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत...
‘इटियाडोह’च्या पाण्यासाठी बेमुदत...गोंदिया ः रब्बीत २४ किलोमीटरपर्यंत इटियाडोह...
काटेपूर्णा प्रकल्पावरून रब्बीसाठी पाणी...अकोला ः जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पातून या...
नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगाम धोक्यातनांदेड : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून सतत...
हर्षवर्धन पाटलांच्या धरणे आंदोलनाची...इंदापूर, जि. पुणे ः भाजप नेते हर्षवर्धन पाटील...
पुणे बाजार समितीत ‘डमी’ अडत्यांचा...पुणे ः बाजार समितीच्या मुळ उद्देशालाच हरताळ...
नगरमध्ये कोथिंबीर, मेथीची आवक वाढलीनगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
शासन व ग्रामपंचायतीच्या समन्वयातून...नाशिक: ग्रामीण भागात विविध योजना व संकल्पनांची...
ई- पीकपाहणीत जळगाव अव्वल ! जळगाव : राज्यातील पहिल्याच ई- पीकपाहणी प्रकल्पाचा...
कव्हेतील डाळिंब बागेची सोलापूर डाळिंब... सोलापूर ः माढा तालुक्यातील कव्हे (ता.माढा)...
 खानदेशात रब्बीची ४० टक्के पेरणी जळगाव ः  खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ...सोलापूर ः राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर २०२१ ते...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५...
धुळीमुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’...गुमगाव, जि. नागपूर : कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील...
तांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे...नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे...
कामे पूर्ण केलेल्या शेतकरी गटांचे ...पुणेः समूह शेती योजनेत भाग घेतलेल्या शेतकरी...
अनुदान वितरणासाठीची नवी प्रणाली सर्वत्र...पुणे ः कृषी योजनांसाठी दिलेल्या निधीचा उपयोग...
 पन्नास एकरांवर शुगरबीट लागवड कोल्हापूर : महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्याला...
कांडली ग्रामपंचायतीची सौरऊर्जेतून...अमरावती ः अचलपूर पंचायत समितीअंतर्गत कांडली...