agriculture news in marathi, The focus of the country on Solapur, Madha's reckoning | Agrowon

सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे लक्ष
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 मे 2019

सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघांतून कोण विजयी होणार, याबाबतची उत्सुकता ताणली गेली असून, कार्यकर्त्यांच्या पैजावर पैजा लागल्या आहेत. या प्रतिष्ठेच्या लढतीच्या निकालांकडे देशाचे लक्ष आहे. आता गुरुवारी (ता. २३) होणाऱ्या मतमोजणीमुळे ही उत्सुकता संपणार आहे. 

सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघांतून कोण विजयी होणार, याबाबतची उत्सुकता ताणली गेली असून, कार्यकर्त्यांच्या पैजावर पैजा लागल्या आहेत. या प्रतिष्ठेच्या लढतीच्या निकालांकडे देशाचे लक्ष आहे. आता गुरुवारी (ता. २३) होणाऱ्या मतमोजणीमुळे ही उत्सुकता संपणार आहे. 

दरम्यान, सोलापूर लोकसभेचा निकाल सायंकाळपर्यंत हाती येणार आहे. तर माढ्याचा निकाल मध्यरात्री उशिरा लागण्याची शक्‍यता आहे. सोलापुरातून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर, भाजपचे डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी अशी तिरंगी लढत आहे. माढ्यात भाजप-शिवसेनेचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी कॉँग्रेसचे संजय शिंदे अशी थेट लढत होत आहे. 

गुरुवारी सकाळी आठ वाजेपासून माढा व सोलापूर मतदारसंघांची मतमोजणी रामवाडी गोदामात होणार आहे. मतमोजणीदरम्यान बंद पडलेल्या ईव्हीएममधील व्हीव्हीपॅटची मतमोजणी सर्वांत शेवटी केली जाणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वांत कमी २० फेऱ्या शहर उत्तर मतदारसंघात होणार आहेत. सर्वाधिक २६ फेऱ्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात होतील. 

‘शहर मध्य''मध्ये २२, दक्षिण सोलापूर, पंढरपूर व मोहोळ विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी २४ फेऱ्या होणार आहेत. माढा मतदारसंघातील सांगोला विधानसभा मतदारसंघात सर्वांत कमी २२ फेऱ्या होतील. सर्वाधिक २७ फेऱ्या माण विधानसभा मतदारसंघात आहेत. करमाळा मतदारसंघात २४, तर माढा, माळशिरस आणि फलटण विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी २५ फेऱ्या होणार 
आहेत. 

माढ्याच्या प्रतिष्ठेचे काय?

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा मतदारसंघ अत्यंत प्रतिष्ठेचा केला. उमेदवारांपेक्षा  पवार आणि फडणवीस यांचीच प्रतिष्ठा यासाठी अधिक पणाला लागली. त्यामुळे माढा सर्वत्र चर्चेत आला. 
सोलापूर मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांना भाजपचे डॉ. महास्वामी लढत देणार होते. पण इथे ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीकडून ॲड. प्रकाश आंबेडकर मैदानात उतरल्याने शिंदे यांची अडचण वाढली, पण दिग्गज उमेदवार आणि तिरंगी लढतीने इथेही लक्ष वेधले आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांत गुलाल कोण उधळणार, याची उत्सुकता आहे.

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...