Agriculture news in marathi Focus on orchard cultivation on nine thousand hectares in Ratnagiri | Page 2 ||| Agrowon

रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे लक्ष

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

रत्नागिरी तालुक्यात मनरेगामधून फळबाग लागवड योजनेंतंर्गत आंबा, काजू, नारळ लागवड केली जात आहे. सातबाऱ्‍यावर मोठ्या प्रमाणात नावे आहेत. त्यामुळे आणेवारी काढताना अडचणी येत आहेत. त्यावर उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांकडून बंधपत्रे घेतली जात आहेत.
- व्ही. एम. हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी.

रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) फळबाग लागवडीला चालना मिळाली आहे. जिल्हा कृषी अधिक्षक आणि जिल्हा परिषद मिळून नऊ हजार हेक्टरवर लागवडीचे लक्ष आहे. 

मनरेगांतर्गत गेल्या चार वर्षांत आंबा, काजूची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. समाधानकारक पावसामुळे कृषी विभागही सज्ज झाला आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाला कृषी सहाय्यकाची ३०० पदे मंजूर आहेत. प्रत्येकाला १० हेक्टरचे लक्ष आहे. गतवर्षी ३७०० हेक्टरवर लागवड झाली. यंदा सव्वाचार हजार हेक्टरवर लागवड केली जाणार आहे. 

गतवर्षी ग्रामसेवकांनी आंदोलन केल्यामुळे लक्षांक पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या होत्या. सध्या तलाठी निसर्ग चक्रीवादळाचे पंचनामे करणे, मदत वाटपात व्यस्त आहे. त्यामुळे सातबारा, बंधपत्र मिळण्यात अडचणी येत आहेत. अतिरिक्त जबाबदारीमुळे तलाठी वेळ मिळेल, तसे ही कागदपत्रे देत आहेत. पुढील महिन्याभरात मनरेगाच्या कामातील हे अडथळे दूर होतील, अशी आशा होती.

आंबा, काजूसह नारळाची रोपे विविध रोपवाटीकांमधून मिळतात. त्यातच कोरोनामुळे अनेक मुंबईकर चाकरमानी कोकणात गावी दाखल झाले आहेत. पडीक जमिनीत शासनाच्या योजनेतून फळबाग लागवड करण्यासाठी ते उत्सूक आहेत. 

दोन हेक्टरची मर्यादा वाढविण्याची गरज

सातबाऱ्‍यांवरील सहहिस्सेदार आणि दोन हेक्टरची मर्यादा ही मोठी समस्या आहे. ८ ‘अ’ ला दोन हेक्टरच्या जमीन नोंद असलेल्यांना लाभ मिळतो. ही मर्यादा काढली, तर कोकणातील मोठे बागायदार लाभ घेऊ शकतील. एका माणसाला सव्वा दोन लाखांपर्यंत अनुदान मिळते. मजुरीचे दर वाढल्याने हेक्टरी आंबा लागवडीला १ लाख ७० हजार, तर काजूसाठी १ लाख ३० हजार रुपये खर्च येतो. दोन हेक्टरवरील लागवडीसाठी खर्चाचा मेळ बसवता येत नाही. त्यामुळे काहींना जागा असूनही लागवड करता येत नाही. ही अट शिथिल करण्याची गरज आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात उसावर ‘हुमणी’चा...सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर...
राधानगरीतून २८०० क्युसेक विसर्गकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर...
सांगली जिल्ह्यात तुरीच्या पेरणी...सांगली : जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि...
मका बनले नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीकयेवला : कांद्याचा अन् द्राक्षाचा जिल्हा अशी...
रत्नागिरीत मत्स्य शेतीकडे छोट्या...रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे...
रासायनिक खतांचा योग्य वापर महत्त्वाचापिकांना खताची मात्रा ठरविण्यापूर्वी जमिनीचे...
मका, सीताफळ, केळी, भाजीपाला पीक सल्ला (...प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्‍त...
दूध प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप...नगर ः दुधाला प्रतिलिटर किमान 30 रुपये दर मिळावा...
सुपारी, आंबा, नारऴ, काजू फळबाग सल्ला (...ढगाळ व दमट वातावरणामुळे, आंब्याच्या नवीन येणाऱ्या...
राज्यात लिंबं २०० ते १६०० रूपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला ५०० ते ७०० रुपये दर...
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...