येवला तालुक्यात चारा, पाणीटंचाई

येवला तालुक्यात चारा, पाणीटंचाई
येवला तालुक्यात चारा, पाणीटंचाई

नाशिक  : येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात पिण्याच्या पाणी आणि चाऱ्यावाचून जनावरांचे हाल सुरू आहेत. चारा, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये तीन-चार दिवसाआड पिण्यासाठी पाणी मिळत आहे. वाड्या-वस्त्यावर विहिरींना पाणी नसल्याने तेथील नागरिकांची वणवण सुरू आहे. 

तालुक्यात माणसांबरोबर जनावरे जगविणे कठीण झाले आहे. तालुक्यातील पालखेड कालवा लाभक्षेत्रातदेखील वाड्या-वस्त्यांवर पाणी मुबलक उपलब्ध नाही. तालुक्यातील कोळगाव, राजापूर, सायगाव, पांजरवाडी, अंगुलगाव, भुलेगाव देवठाण तसेच पूर्वेकडील खामगाव पाटी, रस्ते सुरेगाव, गवंडगाव या भागात वाड्या वस्त्यावर पाण्यासह चाराटंचाई भासू लागली आहे.

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांकडे बैल, गाई , म्हैस, शेळ्या मेंढ्या आशा स्वरूपाचे पशुधन आहे. मात्र पावसाने दांडी मारल्याने चारा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. बाजरी, मका पिकाचा साठवलेला चारा अनेक ठिकाणी संपत आला आहे. ऊस बांडी महागाड्या भागात खरवडी करून दूध उत्पादक गाई सांभाळत आहे. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत जनावरे जगविण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे. 

कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर घटल्याने कांदा पात व वाळलेला चारा पर्यायी म्हणून वापरला जातो. मात्र तोही संपत आला आहे. येवला तालुक्यातील ६ मंडलांपैकी ५ मंडले दुष्काळी म्हणून जाहीर केली आहेत. त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठे प्रयत्न शासकीय यंत्रणेला करावे लागणार असल्याची स्थिती आहे. 

टॅँकर वाढवा, चारा द्या वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांकडून पाण्याचे टॅँकर वाढविण्याची मागणी होत आहे. तसेच जनावरांसाठी चारा उपलबध करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com