शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या
ताज्या घडामोडी
खानदेशात कडब्याची आवक वाढणार
खानदेशात यंदा रब्बी हंगामाची पेरणी अपेक्षेपेक्षा अधिक झाली आहे. त्यात दादर ज्वारी, संकरित ज्वारी, मका, बाजरी या पिकांची पेरणीदेखील बऱ्यापैकी झाली आहे.
जळगाव ः खानदेशात यंदा रब्बी हंगामाची पेरणी अपेक्षेपेक्षा अधिक झाली आहे. त्यात दादर ज्वारी, संकरित ज्वारी, मका, बाजरी या पिकांची पेरणीदेखील बऱ्यापैकी झाली आहे. पिकांची स्थिती चांगली आहे. दादर ज्वारी पीक पक्व होत आहे. पुढील महिन्यात कापणी अनेक भागांत सुरू होईल.
कापणीनंतर खानदेशात दादर ज्वारीच्या कडब्याची उपलब्धता होणार आहे. दादर ज्वारी महत्त्वाचे चारा पीक म्हणूनही ओळखले जाते. दादर ज्वारीचा कडबा सकस असतो. दुधाळ पशुधनासाठी शेतकरी दादरची कुट्टी साठवून ठेवतात. कडब्याचे दर इतर चाऱ्याच्या तुलनेत दुप्पट असतात. गेल्या वर्षी कडबा प्रतिशेकडा चार हजार रुपये होता. यंदाही दर साडेतीन हजार रुपये ते चार हजार रुपये प्रतिशेकडा, असे राहतील, असा अंदाज आहे.
दादरची पेरणी धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील चोपडा, यावल, पाचोरा, जळगाव आदी भागात अधिक झाली आहे. ही पेरणी मिळून सुमारे ३० हजार हेक्टरवर खानदेशात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी दादर ज्वारीची कडबा व धान्यासाठी पेरणी केली होती. कडबा अनेकदा दुरापास्त होतो. तो खरेदी करणे शक्य होत नाही, यामुळे पेरणी करण्यात आली.
फेब्रुवारीत कापणी, मळणी
दादर ज्वारीच्या धान्यासही चांगला उठाव असतो. कोरडवाहू दादर ज्वारी पक्व होत आहे. तिची कापणी, मळणी फेब्रुवारीच्या सुरवातीलाच सुरू होईल. अर्थातच कडब्याची आवक फेब्रुवारीच्या मध्यात असणार आहे. सध्या चारा मुबलक आहे. जळगाव जिल्ह्यात लहान, मोठे ११ लाख पशुधन आहे. सध्या तुरीचा भुसा, मक्याचा कडबा उपलब्ध आहे. पुढे चाऱ्याची उपलब्धता आणखी वाढेल, असे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे.
- 1 of 1055
- ››