बारामती तालुक्‍यातील जनावरांच्या १४ छावण्या बंद 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मोरगाव,जि. पुणे  ः बारामती तालुक्‍यात चौदा ठिकाणी सुरू असलेल्या जनावरांच्या छावण्या ता. ३० सप्टेंबर रोजी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेली सहा महिने पशुधन जगविण्यासाठी असलेला सरकारी चाऱ्याचा आधार तुटला आहे. शेतकऱ्यांवर चारा विकत घेण्याची वेळ आली आहे. 

तालुक्‍यातील टंचाईग्रस्त गावांत एप्रिल ते सप्टेंबरअखेरपर्यंत चौदा ठिकाणी छावण्या सुरू होत्या. तालुक्‍यात कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडला असला तरी अजूनही चारा उपलब्ध झालेला नाही. चारा नाही आणि छावण्याही बंद झाल्याने जनावरांसाठी चारा विकत आणण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. तालुक्‍यात ढाकाळे, पळशी, मुर्टी, मोरगाव, आंबी, खंडूखैरेवाडी, सुपे, देऊळगाव रसाळ, उंडवडी सुपे, उंडवडी कडेपठार, सावळ, जळगाव सुपे, भिलारवाडी, कऱ्हावागज अशा चौदा ठिकाणी चारा छावण्या सुरू होत्या. तालुक्‍यातील चौदा हजारांपेक्षा जास्त जनावरे या सरकारी चाऱ्यावर अवलंबून होती.

मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात काही शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांमुळे जनावरे घरी नेण्यास सुरवात केली. छावण्यात जनावरांची संख्याही कमी झाली होती. छावणीचालक संस्थांनी कमी जनावरांवर छावण्या चालवू शकत नसल्याचे ३० सप्टेंबरला सांगितले. 

छावण्या बंद झाल्याने शेतकऱ्यांना जनावरे घरी घेऊन जावे लागले. छावणी सुरू होईल या आशेने शेतकऱ्यांनी जनावरांसाठी केलेले तात्पुरते शेड तसेच ठेवले असून सरकारने किमान अजून दोन महिने छावण्या सुरू कराव्यात, अशी पशुपालकांची मागणी आहे.    छावण्या आणखी दोन महिने सुरू ठेवण्याची मागणी छावण्या बंद झाल्याने पशुधन जगविण्यासाठी मिळेल तेथून चारा आणण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे. चारा छावण्या किमान आणखी दोन महिने तरी सुरू ठेवाव्यात, अशी मागणी मोरगावचे पशुपालक संदीप तावरे, विकास तावरे, सुभाष तावरे, महादेव तावरे यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com