चारा छावण्यांना ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

चारा छावण्यांना ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
चारा छावण्यांना ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या जनावरांच्या चारा छावण्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळात चाराटंचाईने हैराण झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने ३१ ऑगस्टपर्यंत चारा छावण्या सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे त्या भागातील पशुधनासाठी आवश्यक असणारा चारा व पाणी उपलब्धतेबाबतचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना आवश्यक असलेल्या चाऱ्याच्या प्रश्नावर मात करण्यासाठी शासन निर्णयान्वये जनावरांच्या चारा छावण्या उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मॉन्सूनचे उशिरा झालेले आगमन व त्यामुळे चारा उपलब्ध होण्यासाठी कालावधी लागणार आहे. त्यामुळे यापूर्वी चारा छावण्या १ ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, राज्यात अद्याप मॉन्सूनचा समाधानकारक पाऊस झाला नसल्याने चारा छावण्यांची मुदत वाढविण्याची मागणी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. उद्या, (ता.१) चारा छावणीची शेवटची मुदत असल्याने शेतकरी चिंतेत होते. त्यामुळे चारा छावणीची मुदत पुन्हा वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्यामुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. राज्यात दुष्काळी भागात जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांची मुदत आता ३१ ऑगस्टपपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्य शासनाने तसा शासन निर्णय जारी केला आहे. राज्यात सध्या १,५८३ चारा छावण्या सुरू असून त्यामध्ये लहान व मोठी अशी एकूण सुमारे साडेदहा लाखाहून अधिक जनावरे आहेत. छावण्यांमधील मोठ्या जनावरांना प्रति दिन १०० रुपये आणि लहान जनावरांना ५० रुपये अनुदान दिले जाते. चारा छावण्यांना आतापर्यंत ३९२ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com