agriculture news in marathi, Fodder camp inadequate for subsidies | Agrowon

अनुदानाअभावी चारा छावण्या संकटात
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 मे 2019

बिजवडी, जि. सातारा : माण तालुक्‍यामध्ये १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्‍यात एक एप्रिलपासून जनावरांच्या २८ छावण्या सुरू आहेत. त्यात ३५ हजारांवर छोटी-मोठी जनावरे दाखल आहेत. मात्र दीड महिना उलटूनही शासनाकडून एक रुपयाही अनुदान मिळाले नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे छावणीचालक आर्थिक संकटात सापडले आहेत. 

बिजवडी, जि. सातारा : माण तालुक्‍यामध्ये १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्‍यात एक एप्रिलपासून जनावरांच्या २८ छावण्या सुरू आहेत. त्यात ३५ हजारांवर छोटी-मोठी जनावरे दाखल आहेत. मात्र दीड महिना उलटूनही शासनाकडून एक रुपयाही अनुदान मिळाले नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे छावणीचालक आर्थिक संकटात सापडले आहेत. 

छावण्यांचे प्रस्ताव मंजूर करताना शासनाने संस्थांकडून दहा लाख रुपयांचे बॅंक बॅलन्स प्रमाणपत्र घेतले आहे. बहुतांश संस्थांची आर्थिक ताकद त्यापेक्षा जास्त नसल्याने छावणीचालकांनी ऊस उत्पादक शेतकरी, पशुखाद्य कंपनी, टॅंकरच्या मालकांना धनादेश दिले होते. परंतु शासनाकडून अनुदान न मिळाल्याने ते धनादेश ‘बाऊन्स’ होत आहेत. त्यामुळे संस्थांवर १३८ प्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल होण्याची भीती छावणी चालकांना आहे. 

राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ वीरकर म्हणाले, ‘‘जनावरांसाठी चारा, पाणी, पेंड, सावलीसाठी शेडनेट, कुटीमशिन, सीसीटीव्ही कॅमेरे, लाइटचे साहित्य, मजूर आदींसाठी एका जनावरास १२० रुपये खर्च येत आहे. शासन मात्र एका जनावराला केवळ ९० रुपये अनुदान देत आहे. त्यामुळे छावणीचालक अगोदरच आर्थिक संकटात आहेत. त्यात अनुदान मिळत नाही, असे दुहेरी संकट आहे. वेळेत अनुदान देण्याबरोबरच एका जनावराला १२० रुपये अनुदान मिळणे गरजेचे आहे.’’ 

आर्थिक संकटामुळे तालुक्‍यातील छावण्या बंद झाल्यास जनावरांची उपासमार होईल. होणाऱ्या परिणामाची जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, असा इशाराही छावणी चालकांनी दिला आहे. 

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...