agriculture news in marathi, fodder camp issue, nagar, maharashtra | Agrowon

नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत, छावणीचालकांकडून हेळसांड
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 एप्रिल 2019

जिल्ह्यातील काही छावणीचालक सुविधा देण्यात कुचराई करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. निवडणुकीच्या कामात प्रशासनाचे लक्ष नाही, अशा भ्रमात कोणीही राहू नये. उत्कृष्ट सेवा देणाऱ्या छावणीचालकांचे प्रशासन कौतुक करील; मात्र पशुधनाची हेळसांड करणाऱ्यांना कारवाईच्या माध्यमातून योग्य तो धडा शिकवला जाईल.
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, नगर.

नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा छावण्या सुरू केल्या. त्यात जनावरांना नियमाप्रमाणे खुराक देणे बंधनकारक आहे. टाळाटाळ करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाली. तपासणीसाठी पथकेही नेमलेली आहेत. मात्र, पथके निवडणुकीच्या कामात गुंतल्याचे दिसताच छावणीचालकांनी संधी साधायला सुरवात केली आहे. ‘‘पथकाची पाहणी कमी झाली आणि छावणीचालक शेतकऱ्यांना जुमानायला तयार नाहीत. मागणी करूनही जनावरांना खुराक दिला जात नाही. तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर मुजोरीला सामोरे जावे लागत आहे, ’’ अशा तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या आहेत. 

दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी प्रशासनाने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या आहेत. त्यात नियमानुसार वीज, पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे यांसह अन्य सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत. त्याची तपासणी करण्यासाठी पथकांचीही नियुक्ती केली आहे. मध्यंतरी तपासणी पथकाला त्रुटी आढळलेल्या छावण्यांना दंड केलेला आहे. तो दंड छावणीचालकांना दिल्या जाणाऱ्या रकमेतून वसूल करण्याचे आदेश दिलेले आहेत. जनावरांचे आरोग्य संतुलित राहण्यासाठी जनावरांना खुराक देणे बंधनकारक आहे. सुरवातीच्या काळात सुरळीतपणे दिला जाणारा खुराक आता दिला जात नाही. दिलाच तर तो निकृष्ट आहे. त्याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न झाला तर छावणीचालकांकडून मुजोरी केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘पटत असले तर जनावरे ठेवा, अन्यथा चालते व्हा,’ अशी अरेरावीची भाषा छावणीचालकांकडून केली जाते. चालकांविरोधात शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मोठ्याप्रमाणात तक्रारअर्ज दाखल केले आहेत.

गेल्या अडीच महिन्यांत जिल्हाधिकाऱ्यांनी ४७५ छावण्या मंजूर केल्या आहेत. यातील ३९७ चारा छावण्या प्रत्यक्षात सुरू आहेत. मंजुरी देताना छावणीचालकांनी पशुधनाला चारा, पाणी, खुराक देणे बंधनकारक आहे; परंतु छावण्यांची तपासणी करत असलेले पथक निवडणूक प्रक्रियेत अडकल्याने, काही छावणीचालकांनी सर्व अटी-शर्ती धाब्यावर बसवत मनमानीपद्धतीने कारभार सुरू केला आहे. चारा व खुराकाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुधनासाठी चारा, खुराक दिला जात नसल्याच्या तक्रारी थेट शेतकऱ्यांनीच प्रशासनाकडे केल्या आहेत. सुविधा आणि अनियमितता तपासणीसाठी जिल्ह्यात ३२ पथके नेमली आहेत. एका जनावरासाठी ९० रुपये तर लहान जनावरासाठी ४५ रुपये शासन अनुदान देतेय.

समाजसेवा नव्हे, आर्थिक लाभासाठीच
छावणीचालकांनी छावण्या या समाजसेवेतून सुरू केलेल्या नाहीत, तर त्यातून आर्थिक लाभ मिळावा यासाठीच प्रयत्न केले जात आहे. मिळणाऱ्या अनुदानातून पैसे मिळविण्यासाठीच चाऱ्यात आणि खुराकात कपात करून जनावरांची उपासमार केली जात आहे. छावण्या या राजकीय नेत्यांचे पाठबळ असलेल्या लोकांच्या आहेत. त्यांना खुराक व चाऱ्याबाबत विचारले तर दमदाटी करतात. मारहाण करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. सध्या शेतकऱ्यांना पर्याय नाही त्यामुळे तोंड दाबून बुक्क्याचा मार सोसावा लागत आहे, अशी कैफियत एका शेतकऱ्याने ‘ॲग्रोवन’कडे मांडली.
 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...