agriculture news in Marathi, fodder camp owner in trouble, Maharashtra | Agrowon

चारा छावण्यांसाठी चालकांच्या चकरा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019

नगर  : सरकारने जनावरांच्या छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले खरे, पण अर्ज कुठं करायचा, त्याला काय कागदपत्रे द्यायची, मंजुरी कशी आणि कधी मिळणार याबाबत कसलीही माहिती मिळत नसल्याने चारा छावण्या सुरू करण्यास इच्छुक असलेले संस्था चालक जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारत आहेत. अजून अर्जच उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अध्यादेश निघाला असला तरी छावण्या नेमक्‍या कधी सुरू होणार हे प्रशासनालाही सांगता येईना. 

नगर  : सरकारने जनावरांच्या छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले खरे, पण अर्ज कुठं करायचा, त्याला काय कागदपत्रे द्यायची, मंजुरी कशी आणि कधी मिळणार याबाबत कसलीही माहिती मिळत नसल्याने चारा छावण्या सुरू करण्यास इच्छुक असलेले संस्था चालक जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारत आहेत. अजून अर्जच उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अध्यादेश निघाला असला तरी छावण्या नेमक्‍या कधी सुरू होणार हे प्रशासनालाही सांगता येईना. 

नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळीची तीव्रता अधिक आहे. चारा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न अधिक गंभीर असल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून छावण्या, चारा डेपो सुरू करण्याची मागणी केली जात होती. चारा, पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या ग्रामीण शिवाराला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने २५ जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताकाच्या पूर्वी चारा छावण्या सुरू करण्याचे निर्देश दिले होते.

मात्र, अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज व अटी, शर्तींचा मसुदा बनविण्याचे काम सुरू आहे. छावण्या सुरू करण्यासाठी टंचाई शाखेत इच्छुकांचा गराडा पडत असून चारा छावणी सुरू करण्यासाठी नेमके काय लागते, अर्ज कसा करायचा, याबाबत माहिती मिळेनाशी झाली आहे. 

यंदा पावसाने हात आखडता घेतल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता. जिल्ह्यातील ८९ महसूल मंडलांतील १४२१ गावांत दुष्काळ घोषित झाला असून, चाराटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर चारा छावणी सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. जनावरांसाठी आवश्‍यक तेथे चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला जारी केले आहेत.

छावण्या आवश्‍यकतेनुसार सुरू करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १७ लाख जनावरांच्या दावणीला दिलासा मिळणार आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या अंतिम मंजुरीनंतर हा मसुदा तहसीलदारांकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर संबंधित तहसीलदार प्रस्ताव तयार करून प्रांताधिकाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविणार आहे. 

इतर अॅग्रो विशेष
गैरकृत्यांवर नियंत्रण गरजेचेचनिवडणुकीच्या रणधुमाळीत काही विषय मागे पडतात. कारण...
प्रयोगशील, प्रगतिशील शेतीत रमलेले जाधव...नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे (ता. निफाड) येथे...
आर्थिक प्रगती युवकाने निवडला फूलशेतीचा...बी.कॉम, एमबीए पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या पाठी न...
शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा धूसर :...‘लोकांच्या डोळ्यांवर धर्मांधतेची झापड चढविण्यात...
कर्जफेडीची क्षमता देणाऱ्या धोरणांची गरजविधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राजकीय...
महामंडळाने ‘उद्योग’ बंद केले तरच विकासराज्यातील कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी ‘...
नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर...नाशिक : जिल्ह्यासह बागलाण तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
दूध पावडर अनुदानाचा प्रस्ताव फेटाळलापुणे : राज्यातील दूध पावडर (भुकटी) प्रकल्पांना...
विदर्भातून मॉन्सून परतला  पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गुरुवारपासून पुन्हा वादळी पावसाचा इशारापुणे : राज्यात वादळी पावसाने काहीशी उसंत घेतली...
राज्यातील कांदा उत्पादकांना ५५० कोटींचा...नाशिक ः दसरा-दिवाळीच्या तोंडावर कांद्याला चांगला...
‘ती’चा गावगाड्याला मिळतोय आधारसोलापूर : चूल अन्‌ मूल या मर्यादेला बगल देत महिला...
राजद्रोह कायद्याची गरज काय?का ही वर्षांपूर्वीची ही घटना आहे. एका...
को-मार्केटिंगचा घोळबियाणे, खते, कीडनाशके या कृषी उत्पादनासाठीच्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाचा टोमॅटो पिकाला...नाशिक: जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांत झालेल्या...
झोपडीचा आधार बांबू पोचला सातासमुद्रापारवेलतूर, जि. नागपूरः गरिबांच्या झोपडीचा आधार...
देशाच्या उत्तर-मध्य बहुतांश भागातून...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल-दरमजल...
रब्बीसाठी अनुदानित हरभरा बियाणे उपलब्धपुणे: राज्यात गेल्या रब्बी हंगामात अनुदानित हरभरा...
बुधवारपासून पावसाची शक्यतापुणे: देशातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू...
पावासामुळे खरीप पिके, भाजीपाल्यासह...पुणे : राज्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वादळी...